आमदार संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा श्रीरामपूरमध्ये निषेध गुन्हा दाखल करण्याची ग्रामसेवक संघटनेची प्रशासनाकडे मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
औरंगाबाद येथील सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत संबधितांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीचे निवेदन श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करत गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि तालुका पोलीस श्रीरामपूर यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे तुकाराम जाधव, रामदास जाधव, रुबाब पटेल, दादासाहेब काळे, रमेश निषेध, नीलेश लहारे, हितेश ढुमणे, राजू भालदंड आदिंनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 8 नोव्हेंबर, 2021 रोजी औरंगाबाद याठिकाणी आयोजित सरपंच परिषदेमध्ये आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवकांबद्दल बिभत्स व अपमाजनक तथा अवमानकारक शब्द वापरुन संवर्गाचा अवमान केलेला आहे. वास्तविक पाहता राज्यातील ग्रामसेवक संवर्ग हा शासन व्यवस्थेमध्ये गावपातळीवर काम करणारा शेवटचा घटक असून सदर कामे करताना जनमाणसांशी संपर्क व समन्वय ठेऊन अत्यंत सचोटीने व पारदर्शक पद्धतीने असंख्य अडी-अडचणींवर मात करून काम करणारा घटक आहे. असे असताना सुद्धा आमदारांनी या बाबी विचारात न घेता बेताल वक्तव्य करुन जाणीवपूर्वक जनमाणसांत ग्रामसेवक संवर्गाची प्रतिमा मलीन केली आहे.

या घटनेचा जाहीर निषेध करीत असून, जोपर्यंत आमदार संजय शिरसाठ यांच्यावर शासन दरबारीफौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही, शिवाय राज्यातील ग्रामसेवक संवर्गाची जाहीरपणे माफी मागत नाही; तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलन करीत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर श्रीरामपूर तालुका ग्रामसेवक संघटना डीएनई-136 तालुकाध्यक्ष रमेश निबे, सचिव दादासाहेब काळे, ग्रामसेवक संघाचे तालुकाध्यक्ष नितेश लहारे, सचिव राजू भालदंड, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष रुबाब पटेल, सचिव हितेश ढुमणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुकाराम जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक रामदास जाधव यांच्या समवेत तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ए.ए.विधाते, डी.एल.डोंगरे, पी.पी.दर्शने, एच.एस.ढुमणे, पी.यू.वाघमारे, आर.ए.भालदंड, व्ही.ई.देसाई, आर.आर.कांदळकर, व्ही.एस.मेहेत्रे, बी.एस.म्हस्के, सी.डी.तुंबारे, आर.एफ.जाधव, टी.के.जाधव, पी.व्ही.ढुमणे, आर.बी.ओहोळ, व्ही.एन.धाकतोडे, एस.ए.जाधव, एस.एस.शेटे, एस.डी.उंडे, पी.एन.सोनवणे, आर.व्ही.निबे, आर.आय.पटेल, एन.डी.लहारे, एस.डी.पोळ, समीर मणियार आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Visits: 24 Today: 1 Total: 116565

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *