अडीच महिन्यानंतर जिल्ह्याची रुग्णसंख्या पाचशेच्या घरात! संगमनेर तालुका मात्र उंचावलेलाच; शहरी रुग्णसंख्येतही धक्कादायक वाढ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत खुल्या झालेल्या बाजारपेठांमधूनही कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचा राज्याला दिलासा मिळत असतांना अहमदनगर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आजही कोविडचे संक्रमण भरातच असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष्य अहमदनगरवर खिळले आहे. त्यातही संगमनेरसह काही मोजक्याच तालुक्यातील रुग्णसंख्या कायम असल्याने स्थानिक प्रशासनासह नागरिकांचा हलगर्जीपणाही ठळकपणे समोर येत आहे. रुग्णसंख्या वाढीची श्रृंखला आजही कायम राखतांना जिल्ह्याच्या आजच्या एकूण रुग्णसंख्येतील 102 म्हणजे जवळपास 21 टक्के रुग्ण संगमनेरातून समोर आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्याही आता 32 हजार 861 झाली आहे. आजच्या अहवालात शहरातील 19 रुग्णांचा समावेश असून गेल्या काही दिवसांतील आजची शहरी रुग्णसंख्या अधिक आहे.


एकीकडे जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच तालुक्यातील कोविड संक्रमणाला ब्रेक लागल्याचे चित्र गेल्याकाही दिवसांपासून सातत्याने दिसत असतांना संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा व अकोले तालुक्यातील सरासरी मात्र वाढलेली आहे. त्यातही संगमनेर तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची गती जिल्ह्यात सर्वाधीक असून तालुक्यातून दररोज 153 रुग्ण या सरासरीने रुग्णसंख्येत भर पडत आहे. संक्रमणाच्या बाबतीत जिल्ह्यात दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पारनेर तालुक्यातून दररोज 82, श्रीगोंदा तालुक्यातून 62 तर अकोले तालुक्यातून दररोज सरासरी 61 रुग्ण आढळत आहेत. दुसर्‍या संक्रमणात त्राही उडालेल्या राहाता तालुक्यासह पाथर्डी तालुक्यातील दररोजची रुग्णसंख्या मात्र सरासरी पन्नास रुग्णांच्या खाली आली आहे. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्यातील रुग्णवाढीचा वेग मोठा असल्याने संक्रमण आटोकयत येवूनही जिल्ह्याची अवस्था चिंताजनक बनली आहे.


आजही जिल्ह्यातील सर्वाधीक 102 रुग्ण संगमनेर तालुक्यातूनच समोर आले आहेत. त्यात शहरातील 19 रुग्णांसह सिन्नर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. शहरातील मालदाड रोडवरील आठ वर्षीय मुलगा, महात्मा फुले नगरमधील 34 वर्षीय महिला, गणेश नगरमधील 40 वर्षीय तरुण, भारतनगर मधील 39 वर्षीय तरुण, देवाचा मळा परिसरातील 52 वर्षीय इसमासह 45 व 25 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 90 व 36 वर्षीय महिला, ज्ञानेश्‍वर गल्लीतील 38 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 74 व 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 50 व 43 वर्षीय इसम, 50 वर्षीय महिला, 39, 35 वर्षीय दोघे व 24 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील 17 वर्षीय मुलाचाही बाधितांमध्ये समावेश आहे.


तालुक्यातील 39 गावे व वाड्यावस्त्यांमधील 82 जणांनाही कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या अहवालातून निमोण, सायखिंडी व घारगाव परिसरातून अधिक रुग्ण समोर आले आहेत. निमोण येथील 55 व 35 वर्षीय महिलांसह 36, 34, 32 वर्षीय दोघे, 30 व 18 वर्षीय तरुण, 13 व 11 वर्षीय मुले, सायखिंडीतील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 65 वर्षीय महिला, 50 व 49 वर्षीय इसम, 35 व 25 वर्षीय तरुण आणि चार वर्षीय मुलगा, वडगाव पान येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शेडगाव येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव पावसा येथील 20 वर्षीय तरुण, धांदरफळ येथील 32 वर्षीय महिला, कनोली येथील 85 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 24 वर्षीय तरुण,


उंबरी बाळापूर येथील 70 वर्षीय महिला, कुरकुटवाडीतील 45 वर्षीय इसम, मालदाड येथील 46 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, पानोडी येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय इसम, चिखली येथील 37 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील पाच वर्षीय मुलगा, वेल्हाळे येथील 48 वर्षीय इसमासह 20 वर्षीय तरुणी, रायतेवाडीतील 58 वर्षीय इसम, अंभोरे येथील 65 व 60 वर्षीय महिलांसह 56 वर्षीय इसम, लोहारे येथील 32 वर्षीय तरुण, रणखांब येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, माळेगाव हवेलीतील 29 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 57, 52 व 48 वर्षीय इसमांसह 23 वर्षीय तरुण, समनापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोळवाडे येथील 70 वर्षीय महिला, आश्‍वी बु. येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60 व 50 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण,


जाखुरी येथील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 21 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी व 15 वर्षीय मुलगी, ओझर खुर्द येथील 45 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 48 वर्षीय महिला, झोळे येथील 24 वर्षीय तरुण, घारगाव येथील 65, 30 व 24 वर्षीय महिला, 56 वर्षीय इसम, 21 वर्षीय तरुण, 18 वर्षीय तरुणी व पाच वर्षीय मुलगा, निमगाव जाळी येथील 47 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला व 38 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 55 वर्षीय इसमासह 30 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 20 वर्षीय तरुण, मुंजेवाडीतील 42 वर्षीय महिला, अकलापूर येथील 20 वर्षीय तरुणी, हंगेवाडीतील 47 वर्षीय इसम, डोळासणे 20 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 40 वर्षीय तरुण, बोरबन येथील 35 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुणी संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात आज 652 रुग्णांना डिस्चार्ज, तर 494 रुग्णांनी नव्याने भर..!
मागील अडीच महिन्यात पहिल्यांदाच जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाचशेच्या खाली आली. यापूर्वी 19 जुलैरोजी जिल्ह्यात 460 रुग्ण आढळले होते. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत गेली. आजच्या दिवसातील दुसरा दिलासा म्हणजे जिल्ह्यातील 652 रुग्णांना आज उपचार पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले तर जिल्ह्यात नव्याने 494 रुग्ण आढळले. जिल्ह्यातील आजच्या एकूण रुग्णसंख्येत 21 टक्के रुग्ण एकट्या संगमनेर तालुक्यातील असून महिन्याभरातील एकूण रुग्णही त्याच प्रमाणात आहेत. आजच्या अहवालातून संगमनेर 102, अकोले 53, पारनेर 52, राहाता 51, नगर ग्रामीण 39, नेवासा 30, शेवगाव 28, श्रीगोंदा 25, अहमदनगर महापालिका क्षेत्र 24, कर्जत 23, पाथर्डी 18, कोपरगाव 15, श्रीरामपूर 13, इतर जिल्ह्यातील 11, राहुरी सात व जामखेड तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 44 हजार 237 झाली असून आत्तापर्यंत 3 लाख 32 हजार 583 रुग्णांवर उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 6 हजार 816 नागरिकांचा कोविड बळी गेला असून आजच्या स्थितीत 4 हजार 838 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचा जिल्ह्याचा सरासरी दर आता 96.61 टक्के आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 116205

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *