संगमनेर तालुक्याच्या कोविडच्या रुग्णसंख्येने मोडले आजवरचे सर्व विक्रम! सक्रीय संक्रमित रुग्णांची सातशेवर पोहोचल्याने तालुका ‘लॉकडाऊन’च्या उंबरठ्यावर.. देशातील टॉप 10 मध्ये अहमदनगर जिल्हा..!


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेला कोविडचा उद्रेक काही केल्या शांत होत नसल्याचे दिसत असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने जिल्ह्याची कोविडस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. आजही जिल्ह्यातील सात तालुक्यांमधून उच्चांकी रुग्ण समोर आले असून त्यात संगमनेर तालुक्यात 72 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याने आत्तापर्यंतच्या कोविड इतिहासात सर्वाधीक रुग्ण आढळलेल्या सप्टेंबर महिन्याच्या रुग्णसंख्येलाही मागे टाकले असून तालुक्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. याच गतीने रुग्णवाढ होत राहील्यास आरोग्य यंत्रणांची स्थिती बिघडण्याची भिती निर्माण झाली आहे. आज तालुक्याच्या रुग्णसंख्येत 72 जणांची भर पडल्याने तालुका आता 8 हजार 467 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. तालुक्यात सध्या विक्रमी 706 रुग्ण सक्रीय संक्रमित असून आज 38 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले.


अहमदनगर महापालिका क्षेत्रापाठोपाठ जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत असून या पाच तालुक्यांमध्येच 70 टक्क्याहून अधिक रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्याच्या सरासरी रुग्णवाढीनेही आता प्रचंड वेग घेतला असून फेब्रुवारीची सरासरी 109 रुग्णगती खुप मागे पडून आजच्या स्थितीत तब्बल 569 रुग्ण समोर येत आहेत. बाह्य जिल्ह्यातील रुग्ण वगळता एकट्या मार्चमध्ये अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 17 हजार 62 रुग्ण आढळले आहेत. त्यात आजही मोठी मोठी भर पडली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय आज आढळलेले रुग्ण पुढीलप्रमाणे (कंसात चालू महिन्यातील एकूण रुग्ण) अहमदनगर (महापालिका आणि ग्रामीण) 462 (6450), राहाता 93 (1866), संगमनेर 72 (1588), कोपरगाव 23 (1201), श्रीरामपूर 78 (1038), राहुरी 65 (634), शेवगाव 15 (579), पारनेर 21 (591), पाथर्डी 27 (588), नेवासा 24 (556), अकोले 45 (512), जामखेड 71 (444), श्रीगोंदा 16 (362) व कर्जत 72 (424),

देशातील टॉप 10 मध्ये अहमदनगर जिल्हा..!
देशात सर्वाधीक कोविड बाधित आढळणार्‍या दहा जिल्ह्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश झाला आहे. या यादीत पुणे (59 हजार 475), मुंबई (46 हजार, 248), नागपूर (45 हजार 322), ठाणे (35 हजार 264), नाशिक (26 हजार 553), औरंगाबाद (21 हजार 282), बेगलुरु, कर्नाटक (16 हजार 259), नांदेड (15 हजार 171), दिल्ली (8 हजार 32) आणि अहमदनगर (7 हजार 952) अशा देशातील दहा जिल्ह्यांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या दररोजच्या सरासरी रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली असून आज असलेली सरासरी कोविड सुरु झाल्यापासूनची सर्वाधीक असल्याचेही समोर आले आहे. आजच्या स्थितीत अहमदनगर महापालिका क्षेत्रासह नगर ग्रामीणमधून दररोज सरासरी 569 रुग्ण, त्याखोलाखाल राहाता तालुक्यातून दररोज सरासरी 62 रुग्ण, संगमनेर तालुक्यातून 53 रुग्ण, कोपरगाव तालुक्यातून 40 रुग्ण व श्रीरामपूर तालुक्यातून दररोज सरासरी 35 रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 93 हजार 242 झाली असून 1 हजार 195 जणांचे बळीही गेले आहेत.


संगमनेर तालुक्यात होणारी रुग्णवाढ अत्यंत चिंताजनक असून सरासरीने यापूर्वीच्या कोविड काळातील सर्वोच्च रुग्णसंख्या (1529) असलेल्या सप्टेंबरचा विक्रम मोडित काढला असून आजच्या स्थितीत दररोज 53 रुग्ण या वेगाने मार्च महिन्यातील 30 दिवसांतच 1 हजार 588 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी 51 रुग्णांची भर पडत होती. यावरुन कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाचा वेग सहज लक्षात येतो. आज शासकीय प्रयोगशाळेचे 17, खासगी प्रयोगशाळेचे 41 व रॅपीड अँटीजेनचे 14 असे एकूण 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काही विद्यार्थी, शिक्षक, शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचाही समावेश आहे.


आजच्या अहवालातून शहरातील अभिनवनगर मधील 35 वर्षीय तरुण, चैतन्यनगर मधील 47 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गोविंदनगरमधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, इंदिरानगरमधील 25 वर्षीय तरुण, जानकीनगर मधील 27 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी रोडवरील सात वर्षीय बालिका, मालदाड रोडवरील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 वर्षीय इसम, 24 वर्षीय तरुण व 48, आणि 47 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 43 वर्षीय तरुण, वडजे मळ्यातील 27 वर्षीय तरुण, उपासणी गल्लीतील 9 वर्षीय बालक, दूरसंचार कार्यालयातील 59 व 24 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा उल्लेख असलेले 27, 23 व 21 वर्षीय तरुण आणि 26 वर्षीय महिला.


ग्रामीणभागातील पिंपळगाव देपा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव टेंभी येथील 45 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण व 39 वर्षीय महिला, खांडगाव येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम, आश्‍वी बु. येथील 35 वर्षीय महिला, आश्‍वी खुर्द येथील 30 वर्षीय तरुण, माळवाडी (शिरापूर) येथील 60 वर्षीय महिला, चंदनापूरीतील 65 वर्षीय महिलेसह 37, 34 व 16 वर्षीय तरुण, चिखली येथील 31 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 37 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 18 वर्षीय तरुणी, नान्नज दुमाला येथील 75 वर्षीय महिला, कोळवड्यातील 11 वर्षीय मुलगा व 11 वर्षीय मुलगी, साकूर येथील 42 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 20 वर्षीय तरुण,


सावरगाव तळ येथील 42 वर्षीय महिलेसह 26 वर्षीय दोन तरुण, वडगाव पानमधील 57 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 57 व 54 वर्षीय इसमांसह 30 वर्षीय महिला, चणेगाव येथील 35 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 50 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 65 व 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 24 व 22 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला, कासारे येथील 25 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 26 वर्षीय तरुण, मालदाड येथील 46 वर्षीय इसम, निमोण येथील 14 वर्षीय मुलगी, निमगाव जाळीतील 50 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 35 वर्षीय तरुण, गोल्डनसिटीतील 44 वर्षीय महिला, संगमनेर खुर्दमधील 24 वर्षीय महिला, खळी येथील 70 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 55 वर्षीय इसम व सांगवी येथील 52 वर्षीय इसम. तसेच अन्य तालुक्यातील 60 वर्षीय महिला व 24 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 8 हजार 467 रुग्णसंख्येवर पोहोचला असून सक्रीय रुग्णांची संख्या आता 706 झाली आहे.


कोणत्याही ठिकाणच्या सक्रीय संक्रमितांच्या संख्येवर तेथील आरोग्य यंत्रणा अवलंबून असते. संगमनेर तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 706 झाली आहे. अर्थात त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणात आहेत. मात्र दररोज अशाच वेगाने रुग्ण वाढू लागल्यास बाधितांच्या उपचारांना मर्यादा निर्माण होण्याची भिती असल्याने ‘लॉकडाऊन’ सारखा अंतिम पर्याय वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नको असलेला ‘लॉकडाऊन’ टाळण्यासाठी तालुक्याची रुग्ण सरासरी वाढणार नाही यासाठी कोविडबाबत शासन आणि प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासोबतच सामाजिक अंतर, मास्कचा नेहमी वापर आणि कामाशिवाय बाहेर पडण्याचे टाळायलाच हवे.

Visits: 154 Today: 2 Total: 1588291

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *