लायन्स संगमनेर सॅफ्रॉनच्या वतीने रविवारी चित्रकला स्पर्धाचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर  

लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉनतर्फे रविवार दि. २८ सप्टेंबर  रोजी जागतिक शांतता या विषयावर आधारित  चित्रकला स्पर्धाचे मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत पार पडणार आहे. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असून लायन्स संगमनेर सॅफ्रॉनने नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन सामाजिक भान जपले आहे.  या स्पर्धेमध्ये ५ वी, ६ वी, ७ वी, ८ वी, आणि ९ वी असे पाच गट असणार आहेत. या पाचही गटांसाठी एकूण सहा बक्षिसे, ट्रॉफी, सर्टिफिकेट असणार आहेत.  या स्पर्धेमध्ये चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, प्रकल्प प्रमुख सुनिता मालपाणी, देविदास गोरे, जितेश लोढा, अतुल अभंग यांनी केले आहे. अध्यक्ष अँड. कल्याण कासट, सचिव सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे यांच्याबरोबरच महेश डंग, रोहित मणियार, कृष्णा आसावा, नयन पारख, तुषार डागळे, डॉ. अमोल वालझाडे, संतोष अभंग, अक्षय गोरले, शुभम तवरेज, प्रीती काळे, प्रियंका कासट, नम्रता अभंग, स्वाती लोढा, मिनल अभंग, स्मिता देशमुख, सोनल गोरले, चैताली जोर्वेकर हे सदस्य स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी काम करत आहेत. संगमनेर शहर, ग्रामिण भागातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असतात.

चित्र पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना २ तासांचा कालावधी दिला जाणार आहे. चित्र काढण्यासाठी ड्रॉईंग शीट क्लबतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून पेन, पेन्सील, पॅड, रंग इ. साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत आणायचे आहे. वॉटरकलर, क्रेऑन, पेन्सिल किंवा इतर कोणतेही रंग या स्पर्धेसाठी चालणार आहेत. जागतिक शांततेचा संदेश देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख सुनिता मालपाणी यांनी केले आहे.

 विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच शांततेचे महत्व रूजावे या अनुषंगाने जागतिक शांतता या विषयावर लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली जाते. तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख ग्लोबल ॲक्शन टीम कोऑर्डिनेटर सुनिता मालपाणी यांनी केले आहे.

Visits: 146 Today: 1 Total: 1794758

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *