पंधरवड्यानंतर संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या दोन आकड्यात! सरासरीतही झाली किंचित घट; जिल्ह्यात मात्र सर्वाधीक रुग्ण संगमनेरातच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील कोविड बाधितांची संख्या झपाट्याने खालावत असतांनाही संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या टिकून असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष अवघ्या पाच लाख लोकसंख्येच्या तालुक्यावर खिळले होते. मात्र मोठ्या कालावधीनंतर तालुक्याची रुग्णसंख्या आज खालावली असून तब्बल पंधरवड्यानंतर तालुक्यातून दोन आकडी संख्येत रुग्ण समोर आले आहेत. यापूर्वी 15 सप्टेंबररोजी आढळलेल्या 97 रुग्णांचा अपवाद वगळता संपूर्ण महिन्याभरात तीन आकडी संख्येतच रुग्ण आढळले आहेत. आजच्या अहवालातून शहरातील रुग्णसंख्याही अवघी दहावर आली असून तालुक्यातील एकूण 86 जणांना नव्याने संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 33 हजार 99 झाली आहे.

मागील काही दिवसांपासून देशभरासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून कोविडची स्थिती आटोक्यात येत असतांना अहमदनगर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला होता. जिल्हा मुख्यालयासह जवळपास दहा तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत असतांना संगमनेरसह अन्य चार तालुक्यातून मात्र दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत गेल्याने संक्रमण घटूनही जिल्ह्याची स्थिती चिंताजनक होती. त्यातही अवघ्या पाच लाख लोकसंख्येच्या संगमनेर तालुक्यातून दररोज सरासरी 151 रुग्ण या गतीने रुग्ण समोर येत गेल्याने जिल्ह्याला मात्र दिलासा मिळत नव्हता. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेर तालुक्यावर खिळले होते. मात्र आज तालुक्यासह जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला असून महिन्याभरात केवळ दुसर्‍यांदा रुग्णसंख्या शंभराच्या आंत आली आहे.


आज शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेला अवघा एक, खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले 51 आणि रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून समोर आलेल्या 38 अहवालातून एकूण 90 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील 39 वर्षीय तरुण व सिन्नर तालुक्यातील नळवाडी येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश असून सावरगाव तळ येथील 49 वर्षीय इसमाचे नाव तीनवेळा नोंदविले गेले आहे. आजच्या अहवालातून शहरातील मोगलपूरा येथील 27 वर्षीय महिला, साईनाथ चौक येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, जनता नगर येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 व 30 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 38 वर्षीय महिला, देवीगल्लीतील 52 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 38 वर्षीय तरुणाचा त्यात समावेश आहे.

तर तालुक्यातील 46 गावे व वाड्यावस्त्यांमधून आज 76 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात करुले येथील 27 वर्षीय तरुण, सावरगाव येथील 55 वर्षीय इसम, कोळवाडे येथील 48 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, राजापूर येथील 71 व 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासंह 41 वर्षीय दोन तरुण, 39 वर्षीय महिला व 17 वर्षीय मुलगी, लोहारे येथील 43 व 36 वर्षीय तरुणासह 32 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 39 वर्षीय महिलेसह 35 व 31 वर्षीय तरुण, रहाणे मळा परिसरातील 43 वर्षीय तरुण, कासारवाडीतील 54 वर्षीय महिला, चिखलीतील 50 वर्षीय इसम, कर्‍हे येथील 27 वर्षीय तरुण, देवगाव येथील 70 व 59 वर्षीय महिलांसह 21 वर्षीय तरुणी व एक वर्षीय बालक,


वडगाव पान येथील 49 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा, रायतेवाडीतील 46 वर्षीय इसम, चिकणी येथील 25 वर्षीय महिला, आनंदवाडीतील 46 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 46 वर्षीय इसम, अमृतनगर येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 55 वर्षीय इसम, उंबरी बाळापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 व 32 वर्षीय महिला व 37 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 55 व 40 वर्षीय महिलांसह 27 वर्षीय तरुण, पिंपरी लौकी येथील 35 वर्षीय तरुण, कालेवाडीतील 57 व 56 वर्षीय महिलांसह 26 वर्षीय तरुण, कनोली येथील 23 वर्षीय महिला, निमोण येथील 35 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 50 व 34 वर्षीय महिलांसह 14 व 13 वर्षीय मुले,

अकलापूर येथील 60 वर्षीय महिला, घारगाव येथील 37 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 70 वर्षीय महिला, पानोडीतील 40 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 60 व 50 वर्षीय महिलांसह 20 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्द येथील 50 वर्षीय इसम, आश्‍वी बु. येथील 83 वर्षीय वयोवृद्ध इसम, बोरबन येथील 36 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 46 वर्षीय इसमासह 43 व 26 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 38 वर्षीय तरुण, वडझरी बु. येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जाखुरी येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, डिग्रस येथील 37 वर्षीय तरुण, निंभाळे येथील 52 वर्षीय इसम, बोटा येथील 40 व 39 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 11 वर्षीय मुलगा, शिवापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मनोलीतील 33 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 50 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 49 वर्षीय इसम व चंदनापूरीतील 35 वर्षीय महिलेचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या मात्र कायम!
पंधरवड्यानंतर संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या दोन आकड्यात आली असली तरीही जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येवर मात्र त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही. आज शासकीय प्रयोगशाळेचे 115, खासगी प्रयोगशाळेचे 321 व रॅपीड अँटीजेनच्या चाचणीतील 187 निष्कर्षातून जिल्ह्यातील 623 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यात सर्वाधीक संगमनेर 90, राहाता 87, शेवगाव 61, पारनेर, 57, नगर तालुका 42, नेवासा 38, कर्जत 36, पाथर्डी 35, अहमदनगर महापालिका क्षेत्र 33, श्रीरामपूर 26, श्रीगोंदा 25, राहुरी 24, इतर जिल्ह्यातील 22, कोपरगाव 19, अकोले 17, जामखेड 10 व लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 45 हजार 493 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *