‘शारदा’ पतसंस्था गरजवंतांचे आशास्थान ः जाखडी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शारदा नागरी सहकारी पतसंस्था आपल्या पारदर्शक कारभारामुळे आणि आर्थिक क्षेत्रातील भरगच्च कामगिरीमुळे गरजवंतांचे आशास्थान बनली आहे. संगमनेर तालुक्यातील पतसंस्था चळवळीला बळकटी देणारी ही संस्था म्हणजे संगमनेरचे भूषण आहे, असे प्रतिपादन पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले.

संगमनेर तालुक्याच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉक्टर योगेश भुतडा तर व्हाईस चेअरमनपदी अमर झंवर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. त्यानिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने संस्थेच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शुभेच्छापर भाषण करताना जाखडी यांनी वरील भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप वैद्य, विशाल जाखडी, अरुण कुलकर्णी, ज्येष्ठ तज्ज्ञ संचालक विजय पलोड, माजी चेअरमन आर. आर. मालपाणी, राजकुमार फोफळे, व्यवस्थापक माधव भोर, महेश सराफ, पतसंस्थेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होता. चेअरमन डॉक्टर भुतडा व व्हाईस चेअरमन झंवर हे उद्योजक गिरीश मालपाणींच्या मार्गदर्शनाखाली संस्थेला अधिक प्रगतीपथावर नेतील असा विश्वास जाखडी यांनी व्यक्त केला.

Visits: 19 Today: 1 Total: 118463

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *