गुन्हे तपासणीसाठी श्रीरामपूर पोलिसांना सीसीटीव्हींची मदत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील पोलीस प्रशासनाला शहर परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यात काहीअंशी यश मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासाठी कोरोनाचा लॉकडाऊनही कारणीभूत ठरला. तर, शहरात सीसीटीव्ही बसविल्याने विविध गुन्ह्यांचे प्रमाण वर्षाअखेर घटले आहे. शहर पोलीस ठाण्यात गतवर्षात दाखल गुन्ह्यांपैकी 80 टक्के गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे.

गुन्हेगारी कमी करण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा विशेष फायदा झाला. पोलिसांनी वर्षभरापूर्वी शहरातील प्रमुख चौकासह विविध परिसरात 30 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे सोनसाखळी चोरी, महिलांच्या पर्स, दुचाकी व मोबाईल चोरीचे प्रकार रोखण्यात पोलिसांना यश आले. तसेच चोरीसह अनेक गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा आधार मिळाला.

Visits: 9 Today: 1 Total: 115565

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *