श्रीरामपूरमध्ये बनावट दारु निर्मिती अड्ड्यावर छापा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील संजयनगर परिसरात बनावट मद्य निर्मिती करणार्‍या कारखान्यावर मंगळवारी (ता.22) राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजयनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट देशी-विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एस. बी. शेंडे, एस. एम. सराफ, ए. बी. बनकर, निरीक्षक एस. के. कोल्हे, बी. बी. हुलगे, ए. व्ही. पाटील, पी. व्ही. अहिरराव, एम. डी. कोडे, व्ही. एम. बारवकर, एम. एस. धोका, एस. बी. भगत, के. यू. छत्रे, कुमारी घोडे, नम्रता वाघ आदिंनी छापा टाकला असता बनावट देशी-विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले. पथकाने 200 लिटर स्पिरीट, 30 लिटर विदेशी मद्य, 440 बनावट ब्रँण्डच्या बाटल्या, देशी मद्याच्या 384 बाटल्या तसेच देशी भिंगरी व संत्रा लेबलच्या बाटल्या, कृत्रिम स्वाद पदार्थ इसेन्स, फ्लेवर बॅरल ड्रम आणि पिकअप वाहन असा वाहन असा 6 लाख 50 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी मोहन यशवंत काळे (रा.दत्तनगर), राकेशकुमार केवलप्रसाद दहिया उर्फ मुन्ना (रा.ईटामा कोठार, ता.अमरपाटण, जि.सतना मध्य प्रदेश, ह.मु.संगमनेर) व चंद्रकांत श्याम पवार या तिघांविरुद्ध दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *