शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने लक्ष घालावे!

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने लक्ष घालावे!
शिक्षक परिषदेची संगमनेर तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्य कार्यकारिणीतील निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांच्या अति महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या संगमनेर उपशाखेच्यावतीने कोविड-19 संसर्ग आजाराची परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाचे सर्व नियम-अटी पाळून तहसिलदारांना सोमवारी (ता.7) निवेदन सादर केले.


सदर निवेदनात राज्यातील सर्व डीसीपीएस धारकांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, 1 नोव्हेंबर, 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचार्‍यांचा अपघाती/नैसर्गिक मृत्यू झाला आहे अशा कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी, सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (10:20:20) वर्षे तात्काळ लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील अन्यायकारक त्रुटी दूर कराव्यात, विस्ताराधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांमधून तात्काळ भरावीत, राज्यातील सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना तात्काळ लागू करावी, जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावीत, कोविड-19 साथरोग नियंत्रण कर्तव्य करत असताना ज्या शिक्षक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे अशा शिक्षकांच्या कुटुंबीयांना तातडीने 50 लाखांचे विमा संरक्षण मिळावे; सदरील 50 लाख रुपयांची अनुदान रक्कम त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अदा करावी, 27/02 च्या जिल्हा अंतर्गत बदलीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या प्रक्रिया सर्व जिल्हा परिषदांनी तात्काळ राबवावी आदी मागण्या करण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घुले यांनी दिली.


तहसीलदार अमोल निकम यांना दिलेल्या निवेदनावर उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष आर.पी.रहाणे, विकास मंडळ विश्वस्त भाऊसाहेब ढोकरे, भीमराज उगलमुगले, संतोष भोर, अनिता नेहे, बाळासाहेब मोरे, मच्छिंद्र घुले, सत्यवान गडगे, भाऊसाहेब भागवत, संजय आंबरे, भाऊसाहेब एरंडे, नामदेव शेंडगे, एस.डी.गायकवाड, पुष्पा झिंजाड, बाळासाहेब भागवत, भाऊसाहेब काकड, रावसाहेब शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, भा.दा.सुपेकर, बेबी पानसंबळ, शांता हाडवळे, शैलजा पोखरकर, सुनंदा कानवडे, शाहीन मणियार, लता कढणे, विद्या रहाणे, उषा जंगले, जे.बी.रहाणे, संगीता दिघे, पुष्पा झिंजाड, अनिता मालुंजकर, निता सावंत, सतीष रोकडे, राजेंद्र मुसळे, बाबासाहेब शिरोळे, विक्रांत मते, संभाजी लोंढे, विश्वनाथ चौधरी, भाऊसाहेब काकड, सुनील घुले, मच्छिंद्र ढोकरे, सुनील फटांगरे, दीपक कानवडे, अशोक मधे, शांताराम तळपे, अर्जुन वाघ, रामदास मोरे, विलास शिरोळे, प्रभाकर काळे, अमित पन्हाळे, गणेश वाघ, अशोक शेटे, फुलचंद लेंडे, सुनील दिघे, सुखदेव राजगुरू, संदीप पावसे, डी.डी.वाकचौरे, बाबुराव कदम, भास्कर भोर, मच्छिंद्र आरोटे, रवी भालेराव, दिगंबर वाकळे, नवनाथ बोर्‍हाडे, भाऊ रंधे, भाऊसाहेब येवले, किशोर बिडवे, नीलेश देशमुख, नंदू कुडेकर, भाऊसाहेब खांडगे, विलास घुले, भिकाजी मोरे, संजय पांडे, लक्ष्मण भालेराव, उत्तम राऊत, भास्कर बगाड, रवींद्र पिचड यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *