महावितरणच्या कारभाराबाबत शहरवासियांत तीव्र संताप

महावितरणच्या कारभाराबाबत शहरवासियांत तीव्र संताप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शनिवारी (ता.5) महावितरणने दुरुस्तीसाठी शहरात वीज पुरवठा बंद ठेवला होता. सायंकाळी सहा वाजता प्रवाह सुरू केला तेव्हा विद्यानगर भागातील वलवाणी घर ते खोजे यांच्या घराजवळील वीजवाहक तारांमध्ये जोरदार घर्षण होऊन गायब झालेली वीज थेट दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी (ता.6) दुपारी एक वाजेच्या सुमारास आली. यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत शहरवासियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


कोरोनाच्या संकटाने आधीच पिचलेल्या नागरिकांना मुलभूत समस्यांचा देखील सामना करावा लागत आहे. त्यात वीजबिलांचा घोळही माथ्यावर पडला आहे. वीजबिल भरुनही पुरेशी आणि सतत वीज प्रवाह होत नसल्याने नागरिकांतून महावितरणच्या व्यवस्थेवर संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवारी घर्षणस्थळी तारा कशा तुटल्या हे पाहण्यासही महावितरणच्या कर्मचारी व अधिकार्‍यांना वेळ मिळाला नसल्याचे शहरवासियांचे म्हणणे आहे. जर यदा कदाचित अनर्थ घडला तर त्यास जबाबदार कोण? असा सवालही शहरवासिय उपस्थित करत आहे. रविवारी महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दुरुस्तीचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही काम अर्धवट सोडून परतावे लागले. यामुळे महावितरणच्या कारभारावर शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, सुधारणा झाली नाही तर वेळप्रसंगी आंदोलनही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *