राजूरमध्ये मोकाट फिरणार्‍यांची रॅपिड टेस्ट

नायक वृत्तसेवा, राजूर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारसह प्रशासन विविध उपाय शोधत आहे. त्यातच विनाकारण फिरणार्‍यांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढविली असून, मोकाट संचार करणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन टेस्ट अकोले तालुक्यातील राजूरमध्ये केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विनाकारण फिरणार्‍यांची संख्या घटली आहे.

देशासह राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर झाल्याने खाटा, प्राणवायू, औषधे मिळविण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. त्यात रोजच बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. त्याची प्रशासन कडक अंमलबजावणी करत आहे. तरी देखील बेजाबबदार नागरिक नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत आहे. यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढविली असून, विनाकारण फिरणार्‍यांची जागेवरच रॅपिड अँटीजेन टेस्ट करुन पॉझिटिव्ह आढळल्यास थेट कोविड सेंटरला रवानगी केली जाते. राजूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी कारवाई करत आहे. अजूनही कोविडचे संकट टळलेले नसून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *