शिक्षक समितीचे कुटुंब सर्वेक्षण व लसीकरणाबाबत प्रांताधिकार्‍यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने नुकतेच प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांना कुटुंब सर्वेक्षण व लसीकरणाबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

यावेळी एकल मंचचे राज्य उपाध्यक्ष मोहन लांडगे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, इब्टाचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, रवींद्र अनाप, चंद्रकांत कर्पे, राम हांडे आदी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर यादव यांच्या मृत्यू पश्चात कोरोना योद्धा म्हणून त्यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये मिळावे, अशी आग्रही मागणी केली असता प्रशासनाच्यावतीने सर्वेक्षणाचे लेखी आदेश देऊन पूर्णतः प्रस्ताव पाठविल्यास सहकार्य केले जाईल असे प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे व तहसीलदार निकम यांनी शिष्टमंडळास आश्वासित केले. तसेच 100 टक्के शिक्षकांचे लसीकरण करा, 50 लाख रुपयांचे सुरक्षाकवच प्रदान करा, तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा फ्रंट वॉरियरमध्ये समावेश करा, शिक्षकांना कोविड कुटुंब सर्वेक्षणचे आदेश गटविकास अधिकार्‍यांच्या माध्यमातून द्यावे, कोरोना ग्रामदक्षता समितीला योग्य ती समज द्यावी. यांसह अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. दरम्यान, चंदनापुरी येथील सिंधू लॉन्समध्ये निवेदन देण्यापूर्वीची सहविचार सभा घेण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कानवडे, शिक्षण विस्तार अधिकारी के.के.पवार, केंद्रप्रमुख दशरथ धादवड, आर.पी.रहाणे, राजू रहाणे, पोपट काळे, संदीप पोखरकर, प्रकाश शिंदे आदिंसह शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *