मुख्याधिकार्‍यांची बदली रद्द करा; मनसेची मागणी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने शासन नियमाप्रमाणे त्यांची बदली होणार आहे. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देऊन त्यांची बदली रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना देण्यात आले आहे.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की, हीच मागणी मी यापूर्वी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे. किमान अजून एक वर्ष कोपरगावच्या विकासासाठी प्रशांत सरोदे यांची बदली करू नका, अशी विनंती केली आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, तालुका मार्गदर्शक सुनील फंड, दिव्यांग जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या सह्या आहेत. तर बदली रद्द केली नाही तर तहसील कार्यालयाजवळ आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *