लोकप्रतिनिधी असले म्हणजे तालुक्याचे बाप नाहीत ः पिचड

नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोना संकटकाळात रुग्ण व नागरिकांना मदत करण्याऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी स्टंटबाजी करत आहेत. आपल्या हस्ते उद्घाटन झाले नाही, तर कोविड सेंटरला ऑक्सिजन देणार नाही, अशी धमकी ते देत आहेत असा गंभीर आरोप माजी आमदार वैभव पिचड यांनी आमदार डॉ.किरण लहामटे यांचे नाव न घेता करत तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणजे तालुक्याचे बाप नाहीत, असे सुनावले.

अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथे 50 ऑक्सिजन युक्त बेडच्या कोविड सेंटरच्या उद्घाटन करण्यावरुन झालेल्या मानापमान नाट्याच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. पिचड म्हणाले, तालुक्यातील सर्व शिक्षक, दानशूर व्यक्ती, संस्था यांचे योगदानातून सुगाव खुर्द येथे ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. लोकप्रतिनिधी ही जबाबदार व्यक्ती असून, त्यांनी तुम्हाला ऑक्सिजन कोण देणार आहे, असे म्हणणे शोभत नाही. करोना रुग्ण ऑक्सिजनवाचून हैराण झाले आहेत. काहींनी प्राण गमावला आहे, असे असताना फित कापून देत नाही म्हणून ऑक्सिजनचे राजकारण करण्याची भाषा शोभत नाही. तुम्ही ऑक्सिजन घरून देणार नाहीत, अशी टीका करीत तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तालुक्याचे बाप नाहीत, अशा शब्दांत आमदारांना सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *