सोमवारच्या दिलाशानंतर संगमनेरात आज कोविडचा पुन्हा उद्रेक..! शहरी रुग्णसंख्येतही झाली वाढ; जिल्ह्यात आज 36 जणांचा बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

प्रयोगशाळांच्या सुट्ट्यांनी सोमवारी दिलेल्या दिलाशाची हवा अवघ्या चोवीस तासांत निघून गेली असून आज मंगळवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या आकाशाच्या दिशेने निघाली आहे. आजच्या अहवालातून संगमनेर शहराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसत असले तरीही त्यात केवळ ‘संगमनेर’ असा उल्लेख असलेल्या तब्बल 37 जणांचा समावेश असल्याने आज शहरातून समोर आलेली रुग्णसंख्या शहरातीलच आहे का याबाबत साशंकता आहे. आज शहरासह तालुक्यातील तब्बल 288 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 16 हजार 510 झाली आहे. यात शहरातील 84 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आज 36 जणांचा कोविडने मृत्यू झाला.

     सोमवारी शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांना मिळालेल्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे दैनंदिन अहवालांमध्ये मोठी घसरण झाल्याचे समोर आले. त्यातून जिल्हावासियांना दिलासाही मिळाला होता, मात्र तो तात्पूरता ठरणार असल्याबाबत दैनिक नायकने सोमवारीच आपल्या वृत्तात स्पष्ट केले होते. त्याचा प्रत्यय आजच्या अहवालातून समोर आला असून जिल्ह्याने आज थेट चार हजारांच्या रुग्णसंख्येवर उसळी घेतली आहे. शासकीय प्रयोगशाळेचे 962, खासगी प्रयोगशाळेचे तब्बल 2 हजार 160 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 841 जणांच्या अहवालातून जिल्ह्यातील 3 हजार 963 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर छत्तीस नागरिकांनी आपले जीवही गमावले आहेत.

     आजच्या एकूण अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रात सर्वाधीक 622 रुग्ण समोर आले असून त्याखालोखाल नगर ग्रामीण 414, राहाता 319, राहुरी 317, पारनेर 309, श्रीरामपूर 297, संगमनेर 288, कोपरगाव 245, नेवासा 235, शेवगाव 217, जामखेड 174, श्रीगोंदा 147, पाथर्डी 119, इतर जिल्ह्यातील 101, भिंगार लष्करी परिसर 70, अकोले 50, कर्जत 27, लष्करी रुग्णालय सात तर अन्य राज्यातील पाच रुग्णांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 89 हजार 167 झाली आहे.

     आज शासकीय प्रयोगशाळेचे 61, खासगी प्रयोगशाळेचे 201 आणि रॅपीड अँटीजेनद्वारा मिळालेल्या 26 अशा एकूण 288 अहवालातून संगमनेर तालुक्यातील रुग्ण समोर आले असून त्यात शहरी भागातील 84 (फक्त संगमनेर असा उल्लेख असलेल्या सदतीस अहवालांसह), ग्रामीण भागातील 197 तर अन्य तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. शहरातील पोफळे मळा भागातील 68 वर्षीय महिला, सुविधा सोसायटीतील 63 वर्षीय ज्येष्ठ इसमासह 60 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा व दोन वर्षीय बालिका, मालदाड रोडवरील 60, 57, 55, 49,38 व 25 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, 39, 33, 32 वर्षीय दोघे व 16 वर्षीय तरुण, अभंग मळ्यातील 50 व 47 वर्षीय महिला, मालपाणी विद्यालय परिसरातील 52 वर्षीय इसम व 40 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 52 वर्षीय इसमासह 36, 30 व 29 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला,

     चैतन्यनगर मधील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 व 33 वर्षीय तरुण, 64, 63, 33 व 29 वर्षीय महिला, घासबाजारातील 41 वर्षीय तरुण, जनता नगरमधील 60 वर्षीय महिला, अकोले नाका परिसरातील 53 वर्षीय महिला व 31 वर्षीय तरुण, मेनरोडवरील 48 वर्षीय इसम, नवीन नगर रस्त्यावरील 35 वर्षीय महिला, पंचायत समिती परिसरातील 54 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, साईदर्शन वसाहतीमधील 30 वर्षीय तरुण, देवाचा मळा भागातील 20 वर्षीय तरुण, गोविंद नगरमधील 46 वर्षीय इसम आणि 31 वर्षीय महिला, कुरण रोडवरील 48 वर्षीय इसम, तांबे हॉस्पिटल परिसरातील 45 वर्षीय महिला, जोर्वे रोडवरील 32 वर्षीय महिला आणि केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 72 वर्षीय ज्येष्ठ इसमासह 52, 50, 44 व 43 वर्षीय इसम, 42, 41, 40, 36, 35, 32, 30 वर्षीय दोघे, 29, 28, 26, 25, 20, 19 व 18 वर्षीय दोन तरुण, 54, 42, 41, 37, 36, 35, 31, 27, 25 वर्षीय तिघी व 22 वर्षीय महिला, 21, 19 व 15 वर्षीय तरुणी व नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

     तर ग्रामीण भागात गुंजाळवाडी शिवारातील श्रीराम नगर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गोल्डन सिटीतील 42 व 33 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 42 वर्षीय दोघांसह 33 वर्षीय तरुण आणि 67 व 23 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57 व 45 वर्षीय इसम, 33, 31, 22 व 20 वर्षीय तरुण आणि 80, 60, 30 व 29 वर्षीय महिला, सादतपूर येथील 54 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, दोन वर्षीय बालिका, घुलेवाडी येथील 39, 38, 35, 30 व 28 वर्षीय तरुण, तसेच 39, 35, 27 व 22 वर्षीय महिलांसह 17 वर्षीय तरुणी, 13 वर्षीय मुलगी, दहा वर्षीय मुलगा व एक वर्षाच्या जुळ्या मुली. 

समनापूर येथील  48 वर्षीय इसमासह 34 व 20 वर्षीय तरुण आणि 28 व 25 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 20 वर्षीय तरुणी, सांगवी येथील 17 वर्षीय तरुण, सायखिंडी येथील 69 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, शिबलापूर येथील 26 व 21 वर्षीय तरुण, शिरापूर येथील 60 व 45 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 64 वर्षीय महिलेसह 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 58 वर्षीय इसम, 39 व 35 वर्षीय तरुण, 12 आणि चार वर्षीय मुले,  पिंपरणे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय तरुण व 31 वर्षीय महिला, ढोलेवाडी येथील 55 वर्षीय इसमासह 27 वर्षीय महिला, चिखली येथील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 व 44 वर्षीय इसम, 65 व 31 वर्षीय महिला आणि अकरा वर्षीय मुलगा, बिरेवाडी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसम आणि 38 वर्षीय महिला. 

चंदनापूरी येथील 38 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 70 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील 42 वर्षीय तरुण व 41 वर्षीय महिला, घारगाव येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय इसम, 58 वर्षीय महिला व 29 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 58 वर्षीय इसम, जोर्वे येथील 45 वर्षीय महिलेसह अकरा वर्षीय मुलगा व आठ वर्षीय मुलगी, कनोली येथील 55 वर्षीय इसमासह 48 व 42 वर्षीय महिला आणि 23 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 57 आणि 48 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 व 34 वर्षीय तरुण, 38 व 30 वर्षीय दोन महिला, कोल्हेवाडी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 49 वर्षीय इसम, 52 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, लोहारे येथील 32 वर्षीय तरुण व 30 वर्षीय महिला.

हंगेवाडी येथील 24 वर्षीय तरुण, मनोली येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 48 वर्षीय इसम, 32 वर्षीय महिला आणि दहा वर्षीय मुलगी, ओझर खुर्द येथील 37, 35 व 32 वर्षीय तरुण, 32 वर्षीय महिला, तेरा व अकरा वर्षीय मुले, उंबरी बाळापूर येथील 35 वर्षीय तरुणासह 29 वर्षीय महिला, कोंंची येथील 57 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला व 42 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 29, 28 व 22 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 70 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 78 वर्षीय महिला, पिंप्री लौकी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 वर्षीय इसम व 51 वर्षीय महिला, मालुंजे येथील 50 वर्षीय महिलेसह 37 वर्षीय तरुण, मांडवे येथील 65 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम.

मंगळापूर येथील 56 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 65 वर्षीय महिला व 39 वर्षीय तरुण, माळेगाव हवेली येथील 52 वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथील 28 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय बालिका, निमोण येथील 44 वर्षीय इसमासह 26 वर्षीय तरुण, ओझर बुद्रुक येथील 57 व 41 वर्षीय महिलासह 35 वर्षीय तरुण, राजापूर येथील 50 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण आणि 70 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुणी, रणखांब येथील 52 वर्षीय इसम, साकूर येथील 46 व 44 वर्षीय इसम, 32 व 21 वर्षीय तरुण, 43 व 39 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी आणि सोळा व अकरा वर्षीय मुली, सावरगाव तळ येथील 44 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण, सोनेवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सुकेवाडी येथील 52, 51 व 45 वर्षीय इसमांंसह 33 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक.

वरुडी पठार येथील 66 वर्षीय महिलेसह 44 वर्षीय इसम व 21 वर्षीय तरुणी, झोळे येथील 60 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, औरंगपूर येथील 43 वर्षीय तरुण, चणेगाव येथील 48 व 43 वर्षीय इसमासह 36 वर्षीय तरुण आणि 34 वर्षीय महिला, चिकणी येथील 24 वर्षीय महिला, काकडवाडी येथील 48 वर्षीय इसम, मालदाड येथील 50, 31 व 26 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 25 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 39 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 48 व 27 वर्षीय महिला, माळेगाव पठारावरील 45 वर्षीय इसमासह 41 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय तरुणी, पारेगाव गडाख येथील 26 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 70 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर येथील 43 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण, निमगाव टेंभी येथील 50 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 50 वर्षीय इसम, देवगाव येथील 48 वर्षीय महिला, डिग्रज येथील 58 वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथील 16 वर्षीय तरुण, तर अकोले तालुक्यातील 48 वर्षीय इसमासह 36 व 35 वर्षीय तरुण, घोगरगाव  येथील 48 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण आणि अहमदनगर येथील 49 व 37 वर्षीय महिला अशा एकूण 288 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज 3 हजार 963 रुग्णांची वाढ, तर 2 हजार 566 रुग्णांना डिस्चार्ज…

जिल्ह्यात आज 3 हजार 963 रुग्णांची नव्याने भर पडली. तर  2 हजार 566 रुग्णांना उपचार पूर्ण केल्याने घरी सोडण्यात आले.  आत्तापर्यंत जिल्ह्यातील  1 लाख 63 हजार 252 रुग्णांनी  उपचार पूर्ण केले आहेत. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 23 हजार 751 इतकी झाली आहे. 

आज जिल्ह्यातील  डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांंमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 578, संगमनेर 140, अकोले 114, जामखेड 86, कर्जत 106, कोपरगाव 119, नगर ग्रामीण 191, नेवासा 109, पारनेर 106, शेवगाव 67, श्रीगोंदा 158, श्रीरामपूर 138, भिंगार परिसरातील 18 आणि इतर जिल्ह्यातील 23 रुग्णांचा समावेश आहे. आज जिल्ह्यातील 36 नागरिकांचा कोविडने मृत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *