प्रयोगशाळांच्या सुट्ट्यांनी दिला संगमनेरसह जिल्ह्याला मोठा दिलासा! गेल्या दोन दिवसांतील प्रलंबित अहवालांमुळे रुग्णसंख्या थेट निम्म्याने घटली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून दररोज उच्चांकी रुग्णसंख्येचे धक्के झेलणार्‍या संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात शनिवारी महाराष्ट्र दिन व रविवारी साप्ताहिक सुट्टी आल्याने शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमधील बहुतांश अहवाल प्रलंबित राहीले, त्याचा परिणाम दररोज सरासरी दोनशेहून अधिक रुग्णांचे धक्के झेलणार्‍या संगमनेरसह संपूर्ण जिल्ह्याला क्षणिक का असेना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यातील 2 हजार 123 जणांचे तर संगमनेर तालुक्यातील अवघ्या 104 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संगमनेर शहराच्या रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी आजच्या अहवालातही कायम असून शहरातील अवघ्या पंधरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यातही बारा रुग्णांनी आपला पत्ता केवळ संगमनेर असा नोंदविलेला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 16 हजार 222 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. तर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 85 हजार 204 झाली आहे.


गेल्या एप्रिलमध्ये तालुक्याने कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेतील सर्वाधीक रुग्णगती धारण केल्याचे समोर आले. फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरु झालेल्या दुसर्‍या संक्रमणाने टप्प्याटप्प्याने प्रादुर्भावाची गती वाढवतांना अवघ्या एकाच महिन्यात तब्बल 6 हजार 445 जणांना बाधा केली. या कालावधीत अनधिकृत स्रोतांच्या वृत्तानुसार संपूर्ण तालुक्यातील दोनशेहून अधिक जणांचा कोविडने बळीही घेतला. त्यावरुन कोविडची दुसरी लाट प्रचंड गतीमान आणि जीवघेणी असल्याचे निष्कर्ष समोर आल्याने 17 एप्रिलपासून राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र संक्रमणाच्या गतीवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. मात्र त्याचवेळी एकीकडे तालुक्यातील ग्रामीणभागात दररोजच्या आकडेवारीतून संक्रमण वाढत असल्याचे दिसत असतांना दुसरीकडे शहरी रुग्णांच्या संख्येला मात्र आहोटी लागल्याचे दिसून आले. शहरातील रुग्णगती रोडावण्यामागे वेगवेगळी कारणे असण्याची शक्यता असून त्याची मिमांसा होणे आवश्यक आहे.


आज अहमदनगर महापालिका क्षेत्रासह गेल्या महिनाभरात एकाहून एक उच्चांक गाठणार्‍या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील रुग्णसंख्येतही मोठी घट झाली. वास्तविक येत्या दोन दिवसांत प्रलंबित असणारे अहवाल समोर आल्यानंतर आज रोडावलेली रुग्णसंख्या पुन्हा उफाळून समोर येणार असल्याने आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी मिळालेला हा दिलासा तात्पूरता ठरणार आहे हे देखील निश्‍चितच आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या अवघ्या 840, खासगी प्रयोशाळेच्या 875 आणि रॅपीड अँटीजेनच्या 408 अहवालातून जिल्ह्यातील 2 हजार 123 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 426, अकोले 267, नगर ग्रामीण 197, पारनेर 134, शेवगाव 127, राहाता 121, श्रीरामपूर 116, राहुरी 113, संगमनेर 104, कर्जत 101, पाथर्डी 96, श्रीगोंदा 84, कोपरगाव 79, नेवासा 75, भिंगार लष्करी परिसर 33, इतर जिल्ह्यातील 31, जामखेड 15, इतर राज्यातील तीन व लष्करी रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे.


तर, आज शासकीय प्रयोगशाळेच्या 50, खासगी प्रयोगशाळेच्या 29 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 25 अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 104 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील अवघ्या तिघांसह केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या बारा जणांचा समावेश आहे. त्यात मालदाड रोडवरील 51 व 42 वर्षीय महिला व मनरोडवरील 84 वर्षीय वयोवृद्ध इसमासह संगमनेर असा उल्लेख करुन पत्ता नोंदविलेल्या 70, 50, 43 व 26 वर्षीय महिलांसह 57, 48 व 44 वर्षीय इसम, 36, 34, 21 व 17 वर्षीय तरुण आणि 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील धांदरफळ बु. येथील 39 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्दमधील 47 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, बिरेवाडीतील 50 वर्षीय इसमासह 34 वर्षीय महिला व 22 आणि 18 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 66 वर्षीय महिला,


रहिमपूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 45 वर्षीय महिला आणि 30 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 49 वर्षीय महिला आणि 26 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 49 वर्षीय इसम, 40, 30 व 27 वर्षीय तरुण आणि 45 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 46 वर्षीय महिला आणि 21 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 35 व 34 वर्षीय तरुण, जोर्वे येथील 41 वर्षीय तरुण, लोहारे येथील 36 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय मुलगा व 11 वर्षीय मुलगी, कासारा दुमाला येथील 75 वर्षीय ज्येष्ठ इसमासह 54 वर्षीय महिला, वाघापूर येथील 45 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, साकूर येथील 17 वर्षीय तरुणी, खांडगाव येथील 49 वर्षीय इसमासह 43 वर्षीय महिला,


सायखिंडीतील 55 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणी, देवगावमधील 18 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 38 वर्षीय तरुणासह 38 व 37 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी व दहा वर्षीय मुलगा, खांजापूर येथील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 42, 38 व 31 वर्षीय तरुण, दैवकौठेतील 43 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 25 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 34 व 22 वर्षीय तरुण, कनोली येथील 45 वर्षीय महिला, मालुंजे येथील 38 व 23 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिला, शेडगाव येथील 48 वर्षीय इसम, पिंप्री लौकीतील 20 वर्षीय तरुण, पानोडीतील 53 वर्षीय इसम, समनापूर येथील 39 वर्षीय महिला, चंदनापूरीतील 30 वर्षीय महिला,


कौठे मलकापूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अंभोरे येथील 70 वर्षीय महिला, निळवंडेतील 23 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 48 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 51 वर्षीय इसम, पारेगाव बु. येथील 27 वर्षीय तरुण व 27 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 60, 54 व 52 वर्षीय महिला, माळेगाव हवेलीतील 25 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 45 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 65 व 45 वर्षीय महिला, तिगांव येथील 80 वर्षीय महिला, कौठे कमळेश्‍वर येथील 61 वर्षीय महिलेसह 34 व 23 वर्षीय तरुण, झोळे येथील 45 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण व बारा वर्षीय मुलगी, आनंदवाडी येथील 35 व 33 वर्षीय तरुण, कोळवाडे येथील 45 वर्षीय महिला आणि 26 वर्षीय तरुण आणि अन्य तालुक्यातील 64 वर्षीय महिला व 53 वर्षीय इसम अशा एकूण 104 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *