राज्यघटनेमुळे सर्वांना समतेचा अधिकार ः आ.डॉ.तांबे संगमनेरात महामानवाला जयंतीनिमित्त अभिवादन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अत्यंत विद्वान व उच्चशिक्षित असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या देणगीमुळे आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. या राज्यघटनेमुळेच सर्वांना समतेचा अधिकार मिळाला असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.

संगमनेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी यशोधन कार्यालय, नवीन नगर रस्ता येथेही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे काँग्रेस गटनेते अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, शिवाजी जगताप, राजू खरात, प्रवीण गायकवाड, राजू वाकचौरे, सचिन साळवे, दत्ता वाकचौरे, विकास जाधव, सुमित वाघमारे, इकबाल सिंग, पी.वाय.दिघे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष चांगदेव खेमनर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *