नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संगमनेर तालुक्यात कोविडचा उद्रेक! जिल्ह्यातही आढळले आजवरचे उच्चांकी रुग्ण; संगमनेरातील सक्रीय रुग्णांची संख्या चौदाशे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अहमदनगर जिल्हावासीयांना कोविडने जोरदार धक्का दिला असून आजवरची उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली आहे. एकीकडे ऑक्सिजन सुविधेच्या खाटा आणि रेमडेसिवीर लशींचा तुटवडा तर दुसरीकडे दररोज उच्चांकी रुग्णवाढ यामुळे जिल्ह्याची कोविड स्थिती अत्यंत कठीण होत चालली असून एकप्रकारे लॉकडाऊनच्या घोषणेसाठी प्रशासनाचे डोळे मंत्रालयाकडे खिळले आहेत. जिल्ह्यातील आजवरच्या कोविड इतिहासातील सर्वाधीक 2 हजार 654 रुग्ण समोर आले आहेत. संगमनेरसह कोपरगाव, राहाता व श्रीरामपूर या तालुक्यातूनही आज दोनशेपेक्षा अधिक तर अकोले तालुक्यातून तब्बल 145 रुग्ण समोर आले आहेत, तर संगमनेरात आज तब्बल 219 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरातील रुग्णसंख्येला ओहोटी तर ग्रामीण रुग्णसंख्येला भरती आल्याचे चित्र दिसत असून आज शहरातील केवळ 33 तर ग्रामीणभागातील 181 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. तालुक्यात आज 1 हजार 384 सक्रीय रुग्ण आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 10 हजार 368 तर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 20 हजार 699 झाली आहे.


गेल्या 5 एप्रिलपासून जिल्ह्यात कठोर निर्बंधांची कडकपणे अंमलबजावणी सुरु असूनही जिल्ह्यातील रुग्णवाढीच्या गतीवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. एकमेकांशी स्पर्धा करणार्‍या रोजच्या रुग्णसंख्या आणि त्यातच मृतांची संख्या यामुळे जिल्ह्यातील कोविडची स्थिती अत्यंत चिंताजनक अवस्थेत पोहोचली असून अहमदनगरसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये बाधितांना खाटा मिळत नसल्याचेही समोर येवू लागले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनही तणावात आले असून राज्यात कधीपासून लॉकडाऊनची घोषणा होते याकडे प्रशासनाचे लक्ष खिळले आहे.


आज जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोविडचा अक्षरशः उद्रेक झाला असून नगर वगळता केवळ पाच तालुक्यातूनच 1100 रुग्ण समोर आले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संक्रमणाची गती वाढल्याने आरोग्य यंत्रणा कमी पडू लागल्या असून रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु झाली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 98, खासगी प्रयोगशाळेचे 30 व रॅपीड अँटीजेनद्वारा 91 अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 219 जणांचे स्राव अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील 33, ग्रामीणभागातील 181 व अन्य तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे.


संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 47 वर्षीय इसम व 25 वर्षीय तरुण, कुंभार आळ्यावरील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, दिल्लीनाका परिसरातील 31 वर्षीय महिला, वडजे मळ्यातील 65 वर्षीय महिलेसह 51 वर्षीय इसम व 38 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 40 वर्षीय तरुण, साईनगरमधील 24 वर्षीय तरुण, जनता नगरमधील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 69, 55 व 34 वर्षीय महिला, रंगारगल्लीतील 65 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुणी, इंदिरानगर मधील 58 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण, वाडेकर गल्लीतील 40 वर्षीय तरुण व 32 वर्षीय महिला, मदिना नगरमधील 25 वर्षीय तरुण, मेनरोडवरील दोन वर्षीय बालक व संगमनेर असा पत्ता असलेल्या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय इसम, 37 व 32 वर्षीय तरुण, 85, 70, 58, 52, 35 व 23 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलाचा त्यात समावेश आहे.


ग्रामीण क्षेत्रातील शिरापूर येथील 38 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, केलेवाडी (बोटा) येथील 50, 29 व 23 वर्षीय महिला, एठेवाडी येथील 35 व 32 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण व 16 वर्षीय तरुणी, सांगवी येथील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 65 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सादरतपूर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 36 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 29 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्दमधील 61 व 29 वर्षीय महिला व 31 वर्षीय तरुण, आश्‍वी बु. मधील 34 वर्षीय महिला, दाढ बु. मधील 40 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 25 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 38 वर्षीय महिला, अंभोरे येथील 51 वर्षीय इसम, वडगाव लांडगा येथील 58 वर्षीय इसम, चिकणीतील 50 वर्षीय इसम,
अकलापूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 48 वर्षीय इसम,

उंबरी बाळापूर येथील 43 व 30 वर्षीय तरुणांसह 30 व 25 वर्षीय महिला, 19 वर्षांच्या दोघींसह 18 वर्षीय तरुणी, 11 वर्षीय मुलगी व दोन वर्षीय बालक, मांची येथील 42 वर्षीय तरुण, कोंची येथील 25 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 45 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला व 15 वर्षीय मुलगा, चिंचपूर येथील 58 वर्षीय इसमासह 40 व 21 वर्षीय तरुण आणि 62 व 58 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 42 वर्षीय तरुण, माळवाडी येथील 45 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, कुरकुटवाडीतील 40 व 28 वर्षीय महिला आणि 32 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, समनापूर येथील 59 वर्षीय इसमासह 55 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 56, 36 व 28 वर्षीय महिलांसह 13 वर्षीय मुलगा,


गुंजाळवाडीतील 63 वर्षीय महिला, 46 वर्षीय इसम व 11 वर्षीय मुलगा, गोल्डन सिटीतील 33 वर्षीय तरुण, विठ्ठलनगर मधील 38 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 39 व 32 वर्षीय तरुणांसह 42, 37 व 28 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी, 14 वर्षीय मुलगी व 10 वर्षीय मुलगा, साकूर येथील 79 वर्षीय वयोवृद्धासह 30 वर्षीय तरुण, पोखरी हवेलीतील 35 वर्षीय महिला, खांडगाव येथील 28 वर्षीय महिला, संगमनेर खुर्दमधील 31 वर्षीय महिला, चंदनापूरीतील 46 वर्षीय इसमासह 37 व 28 वर्षीय महिला व चार वर्षीय बालक, कौठे मलकापूर येथील 23 वर्षीय तरुण, माहुली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खंदरमाळ येथील 73, 66 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 58 व 44 वर्षीय इसमासह 35, 26, 25, 22 वर्षीय दोघे, 21 व 16 वर्षीय तरुण आणि 17 वर्षीय तरुणी, शिरसगाव येथील 45 वर्षीय महिला,


चिंचोली गुरव येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 32, 30 व 20 वर्षीय तरुण, मालदाड येथील 80 वर्षीय वयोवृद्धासह 36 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालिका, कोठे बु. येथील 44 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 75 व 62 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, बोटा येथील 28 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 51 वर्षीय इसम, 43, 40 वर्षीय तिघे, 35 वर्षीय तिघे, 34, 27 वर्षीय दोघे, 23 व 17 वर्षीय दोन तरुण, 63, 58, 56, 38, 37, 36, 34, 30 व 26 वर्षीय दोन महिला, नांदुरी दुमाला येथील 42 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय तरुणी, राजापूर येथील 50 वर्षीय इसम, 38 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 40 व 22 वर्षीय तरुण, देवगाव येथील 35 वर्षीय तरुण, पेमगिरीतील 34 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 40 वर्षीय तरुण,


निमज येथील 40 व 29 वर्षीय तरुणांसह 21 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 22 व 16 वर्षीय तरुण, चिखलीतील 25, 23 वर्षीय दोघे, 21 वर्षीय दोघे, 18 व 17 वर्षीय तरुण, 14 वर्षीय तीन मुले, 45, 43 व 23 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुणी, मंगळापूर येथील 55 व 21 वर्षीय महिलांसह 20 वर्षीय तरुण, लोहारे येथील 50 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण व कासारे येथील 63, 38 व 30 वर्षीय महिलेसह 11 वर्षीय मुलगा तसेच श्रीरामपूर तालुक्यातील चितळी येथील 42 वर्षीय तरुण, गोपालपूर येथील 17 वर्षीय तरुणी, अकोले तालुक्यातील धुमाळवाडी येथील 35 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुण व लोणी येथील 45 वर्षीय महिला अशा एकूण 219 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 10 हजार 338 झाली आहे.


जिल्ह्यात कोविड संक्रमणाची गती वाढली असून आजच्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत अहमदनगर महापालिका क्षेत्रात 476, कोपरगाव 294, संगमनेर 219, राहाता215, श्रीरामपूर 200, कर्जत 162, राहुरी 151, अकोले 145, श्रीगोंदा 124, पारनेर 119, नेवासा व पाथर्डी प्रत्येकी 114, नगर ग्रामीण 105, शेवगाव 92, भिंगार लष्करी परिसर 71, जामखेड 33, इतर जिल्ह्यातील 13 व लष्करी रुग्णालयातील सात जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *