गायी घेण्यासाठी कर्ज वितरण करण्यात येईल ः घुले

नायक वृत्तसेवा, घारगाव
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकर्‍यांनी दूध व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्यावतीने गायी घेण्यासाठी कर्जाचे वितरण मोठ्या प्रमाणात करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष लहानू घुले यांनी दिली.


संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले येथील सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकी संघाचे संचालक अर्जुन घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले, सोसायटीचे सचिव गणपत घुले, माजी अध्यक्ष अर्जुन घुले, संतोष घुले, दादा शेख, लक्ष्मण वाघ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना बाळासाहेब घुले यांनी करत संस्थेच्या वार्षिक लेखा-जोखा मांडला, तर विविध विषयांवर सर्वच सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली. सभासदांना मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये शेततळे, पाईपलाईन, कृषीपंप घेण्यासाठी सुद्धा शेतकर्‍यांना मदत करण्यात येईल. त्याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकी संघाचे संचालक अर्जुन घुले यांनी केले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने नवीन, दुबार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच राजू खरात, उपसरपंच नामदेव घुले, ग्रामपंचायत सदस्य राजू घुले, सीमा कडू, अलका घुले, प्रणाली घुले, ग्रामसेवक मलपुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव बाळासाहेब घुले यांनी केले तर आभार अध्यक्ष लहानू घुले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *