व्यावसायिक वाहनांमध्ये वेगाने वाढणारे ‘मारुती सुझुकी’ ऑटोमोबाईल नेटवर्क

नायक वृत्तसेवा, नगर
मारुती सुझुकीतील व्यावसायिक वाहनांच्या ग्राहकांसाठीचा विभाग आपल्या 235 हून अधिक शहरांमधील 325 हून अधिक आऊटलेट्ससह सर्वाधिक वेगाने वाढणारे ऑटोमोबाइल नेटवर्क ठरला आहे. व्यावसायिक विभागातील ग्राहकांचा खरेदीचा अनुभव नव्या स्वरुपात मांडण्यासाठी या रिटेल चॅनलने मूल्यावर भर देणार्‍या ग्राहकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा समजून घेतल्या आहेत. कमर्शिअल रिटेल माध्यमात गॅसोलाइन आणि फॅक्टरी फिटेड एस-सीएनजी अशा दोन इंधन पर्यायांमध्ये व्यापक श्रेणी उपलब्ध आहे. मारुती सुझुकी कमर्शिअल व्हेईकल गाडी विकत घेण्याचा, चालवण्याचा आणि देखभालीचा असा तीनही बाबतीत कमी खर्च हा तिहेरी लाभ देऊ करत आहे.

मारुती सुझुकीच्या व्यापक सर्विस नेटवर्कच्या सहजसोप्या विक्रीपश्चात सेवेची शाश्वती मिळत असल्याने कमर्शिअल रिटेल नेटवर्कने नुकताच 92 हजारांहून अधिक विक्रीचा टप्पा पार केला. प्रवासी दळणवळण तसेच कार्गो/मालवाहतूक व्यवसायतील ग्राहकांसाठी मारुती सुझुकी कमर्शिअलमध्ये व्यावसायिक वाहनांची व्यापक श्रेणी उपलब्ध आहे. यात सुपर कॅरी आणि इको कार्गो अशा दमदार मालवाहतूक वाहनांसोबतच अल्टो-टूर एच वन, सेलेरिओ-टूर एच टू, डिझायर-टूर एस, इर्टिगा-टूर एम आणि इको-टूर व्ही अशा प्रवासी वाहतूक वाहनांचा समावेश आहे.

याविषयी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले, आमच्या कमर्शिअल विभागाची रचना ग्राहकांच्या बहुविध गरजांच्या दृष्टीने करण्यात आली आहे. आमच्या महत्त्वाच्या ग्राहकांमध्ये मार्केट लोड ऑपरेटर्स, कॅप्टिव ओनर्स, ओनर-कम-ड्रायव्हर्स आणि फ्लीट मालकांचा समावेश आहे. ही वाहने त्यांच्या दैनंदिन व्यवसाय, रोजगार आणि नफ्यातील महत्त्वाचा भाग आहेत. यामुळे ते गाडीची, ती चालवण्याची आणि देखभालीची किंमत याबाबतीत जागरुक राहतात आणि त्याचवेळी त्यांना गाडी बंद केल्यास कमीतकमी डाऊनटाईम मिळतो. आमच्या कमर्शिअल विभागातील वाहने आणि त्यांची आर्थिक खर्च पाहता प्रत्येकच ग्राहक या मूल्यवर्धित सेवांमुळे समाधानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *