स्व.भाऊसाहेब थोरात यांचे रविवारी पुण्यस्मरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
थोर स्वातंत्र्य सेनानी तथा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्यावतीने रविवारी (ता.14) सकाळी 9.30 वाजता कारखाना कार्यस्थळावर माजी राज्यसभा सदस्य, अर्थतज्ज्ञ व नामवंत लेखक डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे हस्ते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली अर्पण कार्यक्रम होणार आहे. तसेच कारखान्याच्या सी.पी.यू. यूनिट व 40 हजार लिटर क्षमतेच्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचेही उद्घाटन होणार असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ यांनी दिली आहे.

रचनात्मक कार्यातून सहकाराची मुहर्तमेढ रोऊन सामान्य माणसाच्या जीवनात आर्थिक स्थैर्य व सुबत्ता निर्माण करणार्‍या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शिस्त, पारदर्शकता व काटकसर या त्रिसूत्रीने आदर्श सहकाराचा मंत्र दिला आहे. त्याच रचनात्मक वाटचालीवर अमृत उद्योग समूह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करीत आहे. रविवारी होणार्‍या या कार्यक्रमांसाठी संगमनेर तालुका, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहे. तरी नागरीकांनी या अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन अमृत उद्योग समूह, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *