संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत पुन्हा चौदा बाधितांची नव्याने भर.! तालुक्याच्या रूग्ण संख्येत दिवसभरात पडली 61 रुग्णांची भर

नायक वृत्तसेवा, संगमनेर

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरकरांना दे धक्का करणाऱ्या कोविडच्या विषाणूंनी आज सकाळच्या सत्रात 47 रुग्णांचा मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता सायंकाळी खासगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून त्यात पुन्हा भर पडली आहे. आज दोन टप्प्यात तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल 61 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या आता 1 हजार 656 वर पोहोचली आहे.

आज सकाळच्या सत्रात मोठ्या कालावधीनंतर जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेकडून 47 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातून संगमनेर शहरातील पंधरा जणांसह तालुक्यातील 32 जण संक्रमित झाल्याचे समोर आले. त्यात शहरातील उपासनी गल्ली परिसरातील 51 वर्षीय पुरुष व 41 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय तरुण व पाच वर्षीय बालक, गणेशनगर परिसरातील 40 वर्षीय तरुण, पावबाकी रोड भागातील 70, 46, 45 व 25 वर्षीय महिला, रंगारगल्लीतील 59 वर्षीय इसमासह 57, 30 व 28 वर्षीय महिला, माळीवाड्यातील 24 वर्षीय तरुण, 28 वर्षीय तरुण अशा 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

तर त्याच अहवालातून तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील रहाणेमळा येथील 38 वर्षीय तरुण, शिरसगाव धुपे येथील 27 वर्षीय तरुण, निंभाळे येथील 70 वर्षीय महिला, खांडगाव येथील 55 वर्षीय इसम व 50 वर्षीय महिला, रहिमपूर येथील 55, 37 व 29 वर्षीय पुरुषांसह 40, 36, 26, 25, 20, 18 व 15 वर्षीय महिला व सात वर्षीय बालक, घुलेवाडी येथील 46 व 29 वर्षीय तरुणांसह नऊ वर्षांचे दोन, सात वर्षे व तीन वर्ष वयाच्या बालकांसह 29, 26, 20, 18 व 13 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालिका, खराडी येथील 26 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आले. आता त्यात आणखी 14 रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुक्याचा प्रवास सतराव्या शतकाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे.

आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील केवळ एका रुग्णाचा समावेश आहे. या अहवालातून नवीन नगर रोड परिसरातील 65 वर्षीय पुरुष बाधित झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील अन्य तेरा जणांमध्ये कौठे कमळेश्वर येथील तेवीस वर्षीय महिला, कुरकुटवाडी येथील 38 वर्षीय महिला, बोटा येथील 34 वर्षीय महिलेसह अकरा वर्षीय मुलगा, समनापुर येथील 62 वर्षीय इसम, जोर्वे येथील 59 वर्षीय इसम, चिंचोली गुरव येथील 25 वर्षीय तरुण, चिकणी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 68 वर्षीय महिला, गुंजाळवाडी शिवारात गोल्डन सिटीतील 40 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपळगाव कोंझिरा येथील 36 वर्षीय तरुणासह साकुर मधील 47 वर्षीय महिलेला कोविडचे संक्रमण झाले आहे. आज सायंकाळच्या सुमारास तालुक्याच्या बाधित रुग्ण संख्यत पुन्हा 14 रुग्णांची भर पडल्याने दिवसभरात 61 रुग्णांसह आजचा दिवस 1 हजार 656 रुग्ण संख्येवर मावळला आहे.

  • आज जिल्ह्यातील ५४६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज..
  • आतापर्यंत १६ हजार ७५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४० टक्के..
  • जिल्ह्यात  आज नव्या ६३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर..

अहमदनगर जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील सरासरी प्रमाण ८०.४० टक्के आहे. शुक्रवारी सायंकाळपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत ६३२ ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ५४७ वर पोहोचली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३५, अँटीजेन चाचणीत १२३ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले.

साडेतीन हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु..

संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ हजार ५४७ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १ हजार २९४, संगमनेर २४५, राहाता २२४, पाथर्डी १११, नगर तालुका २३२, श्रीरामपूर १६५, अहमदनगरचे लष्करी क्षेत्र ६४, नेवासा १०२, श्रीगोंदा १५८, पारनेर ९५, अकोले १५७, राहुरी १०१, शेवगाव ८४, कोपरगाव २४३, जामखेड १३३, कर्जत १०२, लष्करी रुग्णालय ३४ आणि अन्य जिल्ह्यातील ०३ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोविड केअर हेल्थ सेंटरमधून आज ५४६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१९, संगमनेर ०९, राहाता ३०, पाथर्डी २५, नगर तालुका ४४, श्रीरामपूर २०, लष्करी परिसर १२, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर २५, अकोले ०८, राहुरी ४०, शेवगाव १३, कोपरगाव ३०, जामखेड २१, कर्जत ०८, लष्करी रुग्णालय ०३ आणि अन्य जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत, जिल्ह्यातील १६ हजार ७५७ रुग्णांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले आहे. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ६ हजार ९५६, संगमनेर १ हजार ३५६, राहाता ७७३, पाथर्डी ८३२, नगर तालुका १ हजार ५६, श्रीरामपूर ६७१, लष्करी क्षेत्र ४६७, नेवासा ५९८, श्रीगोंदा ६३२, पारनेर ६७३, अकोले ३४५, राहुरी ३३१, शेवगाव ४८०, कोपरगाव ६२७, जामखेड ३९३, कर्जत ४७३, लष्करी रुग्णालय ७३, इतर जिल्हा २० आणि इतर राज्य एक या रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यातील बरे झालेले रुग्ण : १६ हजार ७५७
  • जिल्ह्यातील उपचार सुरू असलेले रूग्ण : ३ हजार ५४७
  • जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : २८१
  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : २० हजार ५८५
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४० टक्के
  • आज नव्या ६३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर जिल्ह्यातील ५४६ रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात उपचारांती पूर्णतः बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणही आता ८१.४० टक्के झाले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *