संगमनेर तालुक्यावर आदळली कोविड संक्रमणाची दुसरी लाट? विद्यमान नगरसेवक जोडप्यासह अवघ्या बारा तासांत आढळले शंभरावर बाधित रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
धूमधडाक्यात सुरू असलेले लग्न सोहळे आणि कोविडच्या नियमांची सर्रास पायमल्ली यामुळे संगमनेर तालुक्यावरील कोविडचे संकट अधिक गहिरे झाले आहे. गुरुवारी सायंकाळी गेल्या तीन महिन्यातील उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली असतांना आता शुक्रवारी सकाळीच त्यात जवळपास अर्धशतकीय भर पडल्याने अवघ्या बारा तासांतच संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 101 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांचा आकडा अवघ्या तीन दिवसांतच झपाट्याने वाढून 6 हजार 748 वर जावून पोहोचला आहे. रुग्ण सापडण्याची गती पाहता संगमनेरात कोविड संक्रमणाची दुसरी लाट आदळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने कोविड संक्रमणात वाढ होत असल्याचे दिसत होते. मात्र मागील तीनच दिवसांत संक्रमणाने जोरदार वेग घेतला असून अवघ्या 48 तासांमध्ये तब्बल 132 तर अवघ्या बारा तासांमध्ये 101 रुग्णांची वाढ नोंदविली गेली आहे. त्यातही तालुक्यातील संशयित रुग्णांची सध्या केवळ आरटीपीसीआर चाचणीच करण्यात येत असल्याने रुग्णसमोर येण्याचे प्रमाण वास्तवापेक्षा कमी आहे. प्रशासनाने रॅपिड अँटीजेन चाचण्यांना सुरुवात केल्यास रुग्णवाढीचा दर अनेक पटींनी वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. कोविड नियमांकडे सपशेल दुर्लक्ष करुन तालुक्याच्या ग्रामीणभागात होणारे धूमधड्याक्यातील लग्न सोहळे त्यामागील मोठे कारण असल्याचेही बोलले जात असून मंगल कार्यालये व लॉन्स टाळून होणारे लग्न सोहळे त्याला कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालातून खासगी प्रयोगशाळेकडून 33 तर शासकीय प्रयोगशाळेकडून 20 अशा एकूण 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. हा अहवाल प्राप्त होवून जेमतेम बारा तास उलटायच्या आतच आज (ता.26) सकाळीच प्राप्त झालेल्या अहवालातून खासगी प्रयोगशाळेकडून 28 तर शासकीय प्रयोगशाळेकडून 20 असे एकूण 48 जणांची स्राव चाचणी सकारात्मक आल्याचे समोर आले. अवघ्या बारा तासांतच तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल शंभराहून अधिक रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातीचा थंडावलेला कोविड आलेख उफाळला असून कोविडचा उद्रेक झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

गुरुवारी प्राप्त झालेल्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील 22 तर ग्रामीणभागातील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून प्रत्येकी चौदा याप्रमाणे 28 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. शासकीय प्रयोगशाळेकडून केवळ बाधितांची संख्या प्राप्त झाली असून त्याचा तपशील मात्र उपलब्ध होवू शकलेला नाही. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून संगमनेर नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या जोडप्याला कोविडचे संक्रमण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यासोबतच अन्य एका मोठा जनसंपर्क असलेल्या कुटुंबातही कोविडचा शिरकाव झाला असून त्या कुटुंबातील पाचजणांना कोविडची बाधा झाली आहे.

गेल्या बारा तासांत शहरातील गणेश कॉलनीतील 53 वर्षीय इसम, 50 वर्षीय महिला व 26 वर्षीय तरुण, अभिनव नगरमधील 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेसह 51 वर्षीय इसम, 36 व 23 वर्षीय तरुण आणि 49 व 27 वर्षीय महिला, इंदिरानगरमधील 55 वर्षीय महिला, कुंभारआळा परिसरातील 68 वर्षीय महिला, सुतारगल्लीतील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 65 वर्षीय महिला, जयभारत चौकातील 32 वर्षीय महिला, गणेशनगरमधील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 व 34 वर्षीय तरुण व 31 वर्षीय महिला, पोफळे मळा भागातील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जनतानगरमधील 48 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 36 वर्षीय महिला, गुरुद्वारा परिरातील 35 वर्षीय तरुण, देवीगल्लीतील 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 31 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 82, 73, 70, 67, 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 38 व 37 वर्षीय तरुण, आठ वर्षीय मुलगा आणि 84, 63, 60 व 55 वर्षीय महिलांना संक्रमण झाले आहे.

त्यासोबतच ग्रामीणभागातील पोखरी हवेली येथील 50 वर्षीय महिला, गुंजाळवाडी परिसरातील 59 व 57 वर्षीय इसमांसह 19 वर्षीय तरुण व 40 आणि 18 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 58 वर्षीय इसम, कासारा दुमाला येथील 27 वर्षीय तरुण, निमज येथील 30 वर्षीय तरुण, वरुडी पठार येथील 58 वर्षीय महिलेसह 44 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 53 वर्षीय इसम व 51 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 48 वर्षीय इसमासह 19 वर्षीय तरुण व 21 वर्षीय महिला, चंदनापुरी येथल 45 वर्षीय महिला, जाखुरी येथील 54 वर्षीय इसम, रहिमपूर येथल 31 वर्षीय तरुण, वडगाव येथील 27 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 65 वर्षीय महिला, झोळे येथील 36 वर्षीय तरुण, सायखिंडीतील 46 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व संगमनेर खुर्दमधील 55 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. अवघ्या बारा तासांतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 101 रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या आता 6 हजार 748 झाली आहे.


अवघ्या बारा तासांतच जिल्ह्यात साडेतिनशे रुग्ण..
जिल्ह्यात कोविड संक्रमणाची गती मोठ्या प्रमाणात वाढल असून अवघ्या बारा तासांतच जिल्ह्यात तब्बल 347 रुग्ण आढळले आहेत. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रात 109 तर संगमनेर तालुक्यात 101 रुग्ण समोर आले असून त्याखालोखाल राहाता 31, पारनेर 21, जामखेड 15, नगर ग्रामीण 11, पाथर्डी 10, कोपरगाव 9, श्रीरामपूर, श्रीगोंदा व राहुरी येथे प्रत्येकी 8, कर्जत व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी 7, नेवासा 6, अकोले 4 व शेवगाव तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णवाढीचा वेग अहमदनगर शहर व संगमनेर तालुक्यात अधिक असल्याचे वरील आकडेवारीवरुन सहज लक्षात येते.

One thought on “संगमनेर तालुक्यावर आदळली कोविड संक्रमणाची दुसरी लाट? विद्यमान नगरसेवक जोडप्यासह अवघ्या बारा तासांत आढळले शंभरावर बाधित रुग्ण..

  • February 26, 2021 at 12:29 pm
    Permalink

    संगमनेर आणि परिसरातील बातम्या खूप छान पद्धतीने नायक मध्ये मांडल्या जातात विशेषता कोरूना ची आकडेवारी आणि आणि इतर सर्वच बातम्या त्यामुळे नायक या वर्तमानपत्राचे ऑनलाइन वर्तमानपत्राची आम्ही सर्व खूप आतुरतेने वाट पाहत असतो उद्या टीव्हीला किंवा पेपर ला येणार आहे ते आधीच आपल्याला नायक या पेपर मुळे समजते

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *