सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

नायक वृत्तसेवा, नगर
काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील ग्रामपंचायत व सहकारी बँकेची निवडणूक पार पाडली. याचे निकाल लागून राजकीय वातावरण शांत होईपर्यंत पुन्हा एकदा जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.

सन 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 1 हजार 900 पेक्षा अधिक आहे. या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक येणार्‍या वर्षभरात पूर्ण करण्याचे आवाहन सहकार विभागाकडे आहे. जिल्हा बँकेची निवडणूक संपताच राज्य सरकार निवडणूक प्राधिकरण यांच्या मान्यतेने जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील 49 सोसायट्यांच्या निवडणुकींसाठी 22 पासून उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. याची मुदत 27 तारखेपर्यंत आहे. यामध्ये सर्वात जास्त श्रीगोंदा तालुक्यातील 13 तर संगमनेर तालुक्यातील 8 संस्थांचा समावेश आहे.

27 फेब्रुवारीपर्यंत अर्ज विक्री आणि दाखल करणे, 1 मार्चला छाननी, 2 मार्चला उमेदवारांची यादी, 16 मार्चपर्यंत माघार आणि 17 मार्चला चिन्ह वाटप, अंदाजे 26 ते 29 दरम्यान निवडणूक आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार असा कार्यक्रम आखण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *