महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी संजय कर्पे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजातील एकजूट समाजाच्या प्रगतीचे कारण ठरु शकते असा मूलमंत्र असलेल्या महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज संघटनेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात संगमनेरचे तरुण कार्यकर्ते संजय कर्पे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. समाजाचे प्रदेश महासभाध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विक्रांत वाघचौरे यांच्या उपस्थितीत नूतन पदाधिकार्‍यांचे नावे जाहीर करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षपद राहुरीचे माजी नगराध्यक्ष असाराम शेजूळ यांनी भूषविले. यावेळी समाज संघटन अधिक बळकट करण्यासाठी तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली.


तिळवण तेली समाजाच्या महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या कार्यकारणीची बैठक संगमनेर येथे पार पडली. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील तेली समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कर्पे यांच्यावर जिल्हाउपाध्यक्षपदाची धूरा सोपविण्याचा निर्णय झाला. याच बैठकीतील संगमनेर शहर व तालुका तसेच युवक संघटन व जिल्हा पदाधिर्‍यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. त्यात शहराध्यक्षपदी दत्ता शेलार, कार्याध्यक्षपदी संतोष क्षीरसागर, उपाध्यक्ष सुरेश दुर्गुडे व ज्ञानेश्वर भोत, संघटक कैलास शिंदे, सहखजिनदार नितीन वालझाडे, संपर्कप्रमुख आनंद पन्हाळे, मार्गदर्शक श्याम वालझाडे आणि बाळासाहेब पाबळकर. संगमनेर तालुका युवक संघटनेच्या अध्यक्षपदी श्रेयस कर्पे, कार्याध्यक्ष सुशांत कर्पे, शहर उपाध्यक्षपदी शिवराज शिंदे, तसेच संगमनेर तालुका उपाध्यक्षपदी सोमेश्वर कर्पे, संघटक दिलीप कर्डिले व मार्गदर्शक दिलीप आंबेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष विजय काळे, सचिव कैलास बनसोडे, संघटक देविदास कहाणे, निरीक्षक बद्रीनारायण लोखंडे, कोअर कमिटी सदस्य नाना भोत, कार्याध्यक्ष संजय पन्हाळे, उपाध्यक्ष संतोष बनसोडे, जिल्हा युवक संघटन अध्यक्ष राजेश लुटे, अकोले तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, सुरेश नागले, नितीन फल्ले, यशवंत वाघचोरे, ह.भ.प.कर्पे महाराज, सचिन लोखंडे, नंदकिशोर घोडके यांची तर महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शारदा कर्पे, कार्याध्यक्षा प्रमिला घोडके, संघटक वैशाली लुटे, सदस्य कल्पना बनसोडे व संगमनेर तालुकाध्यक्ष अनुराधा कर्पे आदिंच्या निवडीही या बैठकीत जाहीर करण्यात आल्या. नूतन पदाधिकार्‍यांचे तेली समाजातील थोरा-मोठ्यांनी अभिनंदन केले असून नव्या टीमकडून समाजासाठी चांगले काम घडण्याची अपेक्षा वर्तविली आहे.


तेली समाज महाराष्ट्र प्रांतिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेले संजय कर्पे संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणारा कार्यकर्ता म्हणून परिचयाचे आहेत. बाल मनावर संस्काराचे सिंचन करणारा गीता परिवार, मानवी समाजासाठी सतत कार्यरत असलेला रोटरी क्लब, संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रातील जुने संघटन असलेले फे्रंडस सर्कल मंडळ अशा विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सामाजिक कणवेचे दर्शन घडविले आहे. समाजातील तरुणांसाठी त्यांच्या हातून चांगले काम होईल अशी अपेक्षा त्यांच्या निवडीनंतर व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *