आर्थिक साक्षरतेसाठी कडलगांनी दिलेले योगदान प्रेरणादायी ः मालपाणी रौप्यमहोत्सवी वर्षात कडलग इन्व्हेस्टमेंटच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कमावलेल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे, तो कसा वाढवावा, जीवन विमा, आरोग्य विमा व गुंतवणुकीद्वारे आपले व कुटुंबियांचे जीवन कसे सुरक्षित करावे ही आर्थिक साक्षरता समाजामध्ये निर्माण करण्यासाठी कडलग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आर्थिक सल्लागार सुनील कडलग यांनी गेल्या पंचवीस वर्षात दिलेले योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उद्योगपती राजेश मालपाणी यांनी केले.

संगमनेर येथील जीवन विमा, आरोग्य विमा व म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील प्रथितयश ब्रॅण्ड कडलग इन्व्हेस्टमेंटच्या रौप्य महोत्सवी वर्षात ‘टॉप टेन इम्पिरीअल’ या भव्य व्यावसायिक कॉम्प्लेक्समधील नूतन कार्यालयाचे उद्घाटन मातोश्री शकुंतला कडलग यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उद्योगपती राजेश मालपाणी, आमदार डॉ.सुधीर तांबे, बाळासाहेब देशमाने, पत्रकार किसन हासे, कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग, प्रथितयश लेखापरीक्षक सोपान देशमुख, बालरोगतज्ज्ञ ओमप्रकाश सिकची, याह्याखान पठाण, आनंद लोहे, संतोष फटांगरे, वृषाली कडलग, मोनाली फटांगरे, अनिल कडलग उपस्थित होते.

याप्रसंगी मातोश्री शकुंतला कडलग यांचे मातृपुजन करण्यात आले. पंचवीस वर्षांपूर्वीचे कडलग इन्व्हेस्टमेंटचे पहिले एल. आय. सी. विमा ग्राहक भाऊसाहेब गोसावी व सविता गोसावी यांचा हृदय सत्कार कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांच्या हस्ते करण्यात आला. सुनील कडलग यांच्या वाढदिवसानिमित्त नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सुधाकर सहाणे यांनी कडलग इन्व्हेस्टमेंटच्याद्वारे आरोग्य विमा विकत घेऊन कडलग इन्व्हेस्टमेंटच्या नूतन कार्यालयाच्या विमा विक्री सेवेचा शुभारंभ केला. याप्रसंगी कडलग इन्व्हेस्टमेंटचे वरीष्ठ विक्री व्यवस्थापक दीपक बुळकुंडे, अर्चना सरोदे, सूरज म्हस्के, तेजश्री मेहेत्रे, अक्षय सोमवंशी, प्रियंका सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. शेवटी मोहन कडलग यांनी आभार मानले.

कोरोनाच्या आपत्तीनंतर आर्थिक नियोजनाला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. निधी व्यवस्थापन, जीवन विमा, आरोग्य विमा, आपत्कालीन निधी निर्मिती यासाठी गुंतवणूक सल्लागाराची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील ग्राहकांच्या विश्वासामुळेच आपण येथपर्यंत पोहोचलो आहोत. भविष्यातही ही सेवा अधिक समृद्ध करण्यासाठी कडलग इन्व्हेस्टमेंट कार्यरत राहील.
सुनील कडलग (संचालक, कडलग इन्व्हेस्टमेंट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *