शेवटच्या दिवशी उत्तरेत दाखल झाले उच्चांकी उमेदवारी अर्ज! संगमनेर तालुक्यात सुमारे नऊशे सदस्य संख्येसाठी सत्तावीसशे अर्ज दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गावच्या राजकारणाचा केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठी गर्दी झाली होती. यंदा संपूर्ण जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकीचा धुराळा उडणार आहे. उमेदवारी दाखल करण्यापासून त्याला सुरुवात झाली आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 378 ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही होत असून त्यासाठी 11 हजार 955 जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींचा समावेश असून 888 सदस्यांसाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी तालुक्यातून उच्चांकी 2 हजार 678 अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांसाठी बुधवारी (ता.30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी होती. गावागावातील राजकारणाचा केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होवून गावातील वातावरण सौहार्दपूर्ण रहावे यासाठी ठिकठिकाणच्या नेत्यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्याचे फळ माघारीच्या दिवशी बघायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कालच्या शेवटच्या दिवशी उत्तरेतील 378 ग्रामपंचायतींसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळाले.

यंदा उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील (कंसात एकूण उमेदवारी अर्ज) 52 ग्रामपंचायतीसाठी (1153), संगमनेर 94 (2678), कोपरगाव 29 (996), श्रीरामपूर 27 (1109), राहाता 25 (1208), राहुरी 44 (1407), नेवासा 59 (2072) व शेवगाव 48 (1332) अशा एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी एकूण 11 हजार 955 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये संगमनेर तालुक्याची संख्या सर्वाधिक असून उमेदवारांची संख्याही उच्चांकी आहे.

संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्दमधील नऊ जागांसाठी 26, कनोली येथील अकरा जागांसाठी 34, रायतेवाडी येथील नऊ जागांसाठी 37, हिवरगाव पावसा येथील अकरा जागांसाठी 32, सांगवी येथील सात जागांसाठी 25, कौठे धांदरफळ येथील सात जागांसाठी 23, मिर्झापूर येथील सात जागांसाठी 17, डिग्रस येथील नऊ जागांसाठी 37, निमगाव टेंभी येथील सात जागांसाठी अकरा, कुरण येथील अकरा जागांसाठी 44, समनापूर येथील 15 जागांसाठी 48, खरशिंदे येथील सात जागांसाठी 15, पिंपळगाव देपा येथील 11 जागांसाठी 37, नांदू खंदरमाळ येथील नऊ जागांसाठी 19, वरुडी पठार येथील सात जागांसाठी 29, खंदरमाळवाडी येथील अकरा जागांसाठी 20, जवळे बाळेश्वर येथील नऊ जागांसाठी 20, महालवाडी येथील सात जागांसाठी 15, कर्‍हे येथील नऊ जागांसाठी 24, सोनेवाडी येथील सात जागांसाठी 20, पिंपळगाव माथा येथील सात जागांसाठी 15, झोळे येथील अकरा जागांसाठी 30.

कौठे बु. येथील नऊ जागांसाठी 25, वनकुटे येथील सात जागांसाठी 17, खांडगाव येथील अकरा जागांसाठी 48, संगमनेर खुर्द येथील तरा जागांसाठी 34, कुरकुंडी येथील सात जागांसाठी 18, कुरकुटवाडी येथील नऊ जागांसाठी 15, चणेगाव येथील नऊ जागांसाठी 24, दाढ खुर्द येथील नऊ जागांसाठी 28, माळेगाव पठार येथील सात जागांसाठी 18, आंबी खालसा येथील अकरा जागांसाठी 17, झरेकाठी येथील नऊ जागांसाठी 39, शेडगाव येथील नऊ जागांसाठी 37, भोजदारी येथील नऊ जागांसाठी 12, अकलापूर येथील तेरा जागांसाठी 29, प्रतापपूर येथील नऊ जागांसाठी 63, मनोली येथील अकरा जागांसाठी 40, शिरसगाव धुपे येथील सात जागांसाठी 21, वडगाव लांडगा येथील तेरा जागांसाठी 37, रायते येथील सात जागांसाठी 13, जाखुरी येथील नऊ जागांसाठी 30, देवगाव येथील नऊ जागांसाठी 26, शिरापूर येथील सात जागांसाठी 14, वडगावपान येथील तेरा जागांसाठी 32, मालदाड येथील अकरा जागांसाठी 58.
लोहारे येथील नऊ जागांसाठी 18, कासारे येथील नऊ जागांसाठी 39, देवकौठे येथील सात जागांसाठी 22, पारेगाव बु. येथील नऊ जागांसाठी 34, चंदनापुरी येथील तेरा जागांसाठी 42, सावरगाव तळ येथील अकरा जागांसाठी 17, खळी येथील नऊ जागांसाठी 16, पिंप्री लौकी (आजमपूर) येथील अकरा जागांसाठी 34, नांदूरी दुमाला येथील अकरा जागांसाठी 37, पेमगिरी येथील अकरा जागांसाठी 42, मंगळापूर येथील नऊ जागांसाठी 41, वेल्हाळे येथील तेरा जागांसाठी 35, मिरपूर येथील सात जागांसाठी 24, पळसखेडे येथील नऊ जागांसाठी 26, औरंगपूर येथील सात जागांसाठी 28, चिंचपूर बु. येथील तेरा जागांसाठी 58, पिंपळे येथील नऊ जागांसाठी 35, पारेगाव खुर्द येथील सात जागांसाठी 35, कोंची-मांची येथील नऊ जागांसाठी 17, कोकणगाव येथील अकरा जागांसाठी 35, खांबे येथील अकरा जागांसाठी 29, वरवंडी येथील अकरा जागांसाठी 26.

कौठे खुर्द येथील सात जागांसाठी 14, बोटा येथील 15 जागांसाठी 47, हिवरगाव पठार येथील नऊ जागांसाठी 12, शेंडेवाडी येथील सात जागांसाठी 17, म्हसवंडी येथील सात जागांसाठी 13, आंबी दुमाला येथील नऊ जागांसाठी 29, चिखली येथील नऊ जागांसाठी 32, कासारा दुमाला येथील तेरा जागांसाठी 43, माळेगाव हवेली येथील सात जागांसाठी 13, तिगांव येथील सात जागांसाठी 19, सोनुशी येथील सात जागांसाठी 32, सावरगाव घुले येथील नऊ जागांसाठी 28, पोखरी बाळेश्वर येथील नऊ जागांसाठी 22, निमगाव खुर्द येथील नऊ जागांसाठी 18, सावरचोळ येथील नऊ जागांसाठी 28, निमगाव बु. येथील 11 जागांसाठी 31, सुकेवाडी येथील तेरा जागांसाठी 31, कौठे कमळेश्वर येथील नऊ जागांसाठी 33, मेंढवण येथील नऊ जागांसाठी 20, खांजापूर येथील सात जागांसाठी 22, शिंदोडी येथील नऊ जागांसाठी 25, कौठे मलकापूर येथील सात जागांसाठी 20, जवळे कडलग येथील तेरा जागांसाठी 34, राजापूर मधील 13 जागांसाठी 54, शिबलापूर येथील अकरा जागांसाठी 44 व पानोडी येथील अकरा जागांसाठी 34 अशा एकूण 888 जागांसाठी 2 हजार 678 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात बुधवारी (ता.30) एकाच दिवशी तब्बल 2 हजार 72 अर्ज दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *