… अखेर कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे

… अखेर कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आंदोलन मागे
नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी 27 ऑक्टोबरपासून सुरू केलेले आंदोलन मंगळवारी (ता.10) घेण्यात आले आहे.

मुंबई येथे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या दालनात खासदान विनायक राऊत, राजन विचारे, आमदार योगेश कदम, नितीन देशमुख, विजयराज शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने राज्यातील कृषी विद्यापीठांना लवकर लागू करण्याचे, तसेच 10, 20, 30 प्रमाणे आश्वासित प्रगती योजनेबाबत दिवाळीनंतर बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले. त्यानंतर कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतल्याची माहिती समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ.चिंतामणी देवकर यांनी दिली. डॉ.देवकर यांच्यासह डॉ.विठ्ठल नाईक (दापोली), डॉ.संजय कोकाटे (अकोला), डॉ.दिलीप मोरे (परभणी) बैठकीस उपस्थित होते. विद्यापीठाच्या सर्व कर्मचार्‍यांना विश्वासात घेऊन आंदोलनाची वाटचाल, तसेच शासनाने दिलेल्या आश्वासनाबाबत माहिती देऊन विद्यापीठास आंदोलन मागे घेत असल्याचे पत्र देणार असल्याचे डॉ.देवकर म्हणाले. आंदोलनासाठी उपाध्यक्ष डॉ.उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ.महाविरसिंग चौहान, डॉ.सचिन सदाफळ, मच्छिंद्र बेल्हेकर, मच्छिंद्र बाचकर, डॉ.संजय कोळसे, डॉ.कैलास कांबळे, गणेश मेहेत्रे, जनार्दन आव्हाड, संजय ठाणगे यांनी प्रयत्न केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *