एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा आढळले संक्रमित..! शहरातील सहा जणांसह तालुक्यातील रुग्णसंख्येत 28 बाधितांची भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी शहरातील कोविड प्रादुर्भावाने विराम घेतल्यानंतर आज पुन्हा तोंड वर काढले आहे. तर ग्रामीण भागातील संक्रमणात अद्यापही सातत्य कायम आहे. खासगी प्रयोगशाळा आणि रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा आलेल्या निष्कर्षातून आज शहरासह तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 28 जणांची भर पडली असून यातील 22 रुग्ण एकट्या ग्रामीण क्षेत्रातील आहेत. आजही तालुक्यातील रुग्णसंख्या वाढीचा सिलसिला कायम राहील्याने रुग्णसंख्या 4 हजार 367 वर पोहोचली आहे.


सप्टेंबरमध्ये तालुक्यातील रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला. या एकाच महिन्यात एकूण रुग्णसंख्येत दररोज सरासरी 51 रुग्ण वाढून महिना अखेर तब्बल 1 हजार 529 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याने सप्टेंबरमध्येच चार हजाराचा आकडा ओलांडीत 43 व्या शतकाच्या उंबरठ्यावर पाय ठेवला होता. रुग्णवाढीचर हिच गती ऑक्टोबरमध्येही राहील असे वाटत असतांना गेल्यसा महिन्याने मात्र संगमनेरकरांना मोठा दिलासा देत रुग्णसंख्येची गती कमी केली. गेल्या महिनाभरात दररोज 33.65 च्या सरासरीने रुग्ण समोर आले.


दररोजच्या सरासरीत जवळपास 17 रुग्ण कमी झाल्याने ऑक्टोबरमध्ये एकूण रुग्णसंख्येत 1 हजार 43 रुग्णांची भर पडली. संपूर्ण महिन्याने उतरत्या क्रमाने रुग्णसंख्या दाखवित संगमनेरात समाधानाचे वातावरण निर्माण केलेले असताना महिन्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 64 रुग्ण समोर आल्याने तालुक्याच्या रुग्णगतीत काहीशी वाढ झाली. मात्र चालू महिन्याने मात्र अद्यापपर्यत दिलासाच दिला असून 1 नाव्हेंबररोजी शहरातील पाच जणांसह एकूण सतरा, 2 नोव्हेंबररोजी ग्रामीणभागातील 32 व आज शहरातील सहा जणांसह 28 अशा एकूण सरासरी 25.67 च्या गतीने 77 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्याची सुरुवातही समाधानकारक असल्याने चालू महिन्यात तालुक्यातील संक्रमण पूर्णतः थांबण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. मात्र याचा अर्थ कोविड संपला असा मूळीच होणार नाही याचेही स्मरण ठेवावे लागणार आहे.

आज रॅपिड अँटीजेन चाचणी द्वारा 15 तर खाजगी प्रयोगशाळेकडून 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील सहा जणांसह ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश आहे. शहरात आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शिवाजीनगर परिसरातील 16 वर्षीय मुलगा, मारवाडी गल्लीतील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, विद्यानगर परिसरातील 47 वर्षीय इसम, अकोले रोड परिसरातील 48 वर्षीय इसम, बडोदा बँक कॉलनी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व पंचायत समिती जवळील 56 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यासोबतच तालुक्यातील पिंपरणे येथील 20 वर्षीय तरुणासह 19 वर्षीय तरुणी, निमगाव टेंभी येथील दोन वर्षीय बालक, राजापूर येथील 70 वर्षीय महिलेसह 30 वर्षीय तरुण,

उंबरी बाळापूर येथील 45 वर्षीय महिला, जोर्वे येथील 30 व 22 वर्षीय तरुण, साकुर येथील 51 वर्षीय इसम, कोल्हेवाडी येथील 52 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 57 वर्षीय इसम, आश्वी बुद्रुक येथील 64 वर्षीय महिलेसह 43 वर्षीय तरुण, घुलेवाडी परिसरातील 64, 59 व 50 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, तसेच 52, 34 व 30 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालिका व नऊ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आज 28 रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या 4 हजार 367 वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *