पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत तरस ठार

पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत तरस ठार
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोनवर्षीय नर जातीचे तरस जागीच ठार झाले आहे. सदर घटना मंगळवारी (ता.27) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, खंदरमाळवाडी शिवारातील माहुली येथे महामार्ग ओलंडत असताना त्याच दरम्यान भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची धडक तरसाला बसली. यामध्ये ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच मंडलधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता थोरात, रोहिदास भोईटे, बाळासाहेब वैराळ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत तरसाला कोठे बुद्रुक रोपवाटिकेमध्ये आणून अंत्यसंस्कार केले. दरम्यान यापूर्वीही पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलंडताना अनेक बिबट्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे वनविभागाने वन्यजीव वाचविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *