नेवाशाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ः गडाख

नेवाशाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ः गडाख
तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री गडाखांचा नागरिकांकडून सत्का
नायक वृत्तसेवा, नेवासा
शहरातील विविध विकास कामांसाठी नेवासा नगरपंचायतीला तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा नगरसेवक व नागरिकांच्यावतीने सत्काराद्वारे गौरव करण्यात आला. नेवासा शहराच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी मंत्री गडाख यांनी बोलताना दिली.

विजयादशमीच्या मुहूर्तावर मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते नेवासा शहर परिसरात विविध दालनांचे उद्घाटन झाल्यानंत संपर्क कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी नगरपंचायतला विविध विकास कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नगराध्यक्ष सतीश पिंगळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक लक्ष्मण जगताप, जनाब आत्तार, सचिन वडांगळे, संदीप बेहळे, जितेंद्र कुर्‍हे, अंबादास ईरले, अल्ताफ पठाण यांच्या हस्ते सत्काराद्वारे गौरव करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. निधीअभावी नेवासा शहराचा विकास खुंटला होता. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आम्ही नगरसेवकांनी मंत्री गडाख यांच्याकडे केली होती. याबाबत नगरविकास खात्याकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच नगरपंचायतला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कोरोनाच्या कठीण काळात देखील शहराची विकासाची प्रक्रिया थांबू नये यासाठी मंत्री गडाख यांनी निधी मंजूर करून आणला आहे. मंजूर झालेल्या निधीतून शहरातील रस्ते, भुयारी गटार तसेच सुशोभिकरणाचे काम केले जाईल असे पाटील यांनी सांगितले.

मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, नगरविकास विभागाच्या माध्यमातून तब्बल तीन कोटी रुपयांचा भरभक्कम निधी उपलब्ध झाल्याने शहरात विकासात्मक कामे सुरू करता येतील. नेवाशाकरांच्या हितासाठी व शहराच्या विकासासाठी निधीची काळजी करू नका त्यासाठी मी भक्कम आहे. शहराच्या विकासासाठी व उत्कर्षासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. नगरपंचायतसाठी 7 कोटी 89 लाख 42 हजार रुपयांची मागणी आपण या योजनेंतर्गत निधी म्हणून केली होती. त्यापैकी तीन कोटी रुपये मंजूर झाले असून उर्वरीत निधी देखील लवकरच मंजूर होणार आहे.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ जगताप, गफूर बागवान, शेतकरी नेते पी.आर.जाधव, लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष महंमद शेख (टेलर), व्यापारी अशोक गुगळे, विजय गांधी, सूर्यकांत गांधी, नारायण लोखंडे, पोपट जिरे, बापूसाहेब गायके, अ‍ॅड.जावेद ईनामदार, भाऊसाहेब वाघ, अब्दुल्ला बागवान, दाऊद बागवान, अनिल ताके, महेश मापारी, अभिजीत मापारी, दीपक धनगे, रहेमान पिंजारी, असीफ पठाण, सुलेमान मणियार, शोएब पठाण, फरदीन पठाण उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *