कोरोनात स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष कुठे होते? ः राऊत

कोरोनात स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष कुठे होते? ः राऊत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना महामारीच्या काळात स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष कुठे होते? असा सवाल नाभिक महामंडळाचे दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी केला.


संगमनेर शहरातील हुतात्मा भाई कोतवाल सभागृहात संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तीमत्त्व बाबासाहेब कुटे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, संगमनेर शहराध्यक्ष रमेश सस्कर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. नाभिक युवा पिढीने आता पुढे आले पाहिजे. तरच संघटनेचं काम अधिक जोमाने पुढे जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तर नाभिक समाजाने आता मानसिकता बदलली पाहिजे. पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन व्यवसाय केला तरच स्पर्धेच्या युगात आपण टिकू, असा विश्वास योगेश शिंदे यांनी व्यक्त केला. टाळेबंदीच्या काळात मदत करु शकलो नाही अशी दिलगिरी व्यक्त करुन बाबासाहेब कुटे यांनी 51 जोडप्यांचा सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प बोलून दाखविला. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या नाभिक कोविड योद्ध्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल कडूसकर, सोमनाथ मदने, अशोक जाधव, रागीर बंधू, अनिल सस्कर, व्यवहारे गुरुजी, तुळशीराम मदने, दत्तात्रय जाधव, सहदेव जाधव, मयूर बिडवे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *