तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती पुन्हा झाली वेगवान..! तालुक्याच्या रुग्णसंख्येत  आज पडली ऑक्टोबर महिन्यातील उच्चांकी रुग्णांची भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
या महिन्याच्या सुरुवातीला तालुक्याच्या रुग्णवाढीच्या गतीत घसरण झाल्याने नागरिकांमध्ये काहीसे समाधान निर्माण झाले होते. मात्र या आठवड्यातील मंगळवारी कमी झालेल्या सरासरीत अचानक वाढ झाल्याने सप्टेंबरच्या सरासरी 51 रुग्ण प्रति दिवसाची गती खाली येवून ती 41 रुग्ण प्रति दिवस झाली होती. पण मंगळवारपासून ग्रामीणभागातील संक्रमणाला पुन्हा काहीसा वेग आल्याने तालुक्यातील रुग्णगतीला पुन्हा काहीसा वेग प्राप्त झाला आहे. त्याच कडीत आज ऑक्टोबर महिन्यातील उच्चांकी रुग्ण समोर आले असून शासकीय प्रयोगशाळेकडून अवघे दोन, खाजगी प्रयोगशाळेकडून 20 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून तब्बल 52 रुग्ण समोर आल्याने, तालुक्याच्या रुग्ण संख्येने आज उसळी घेत 36 वे शतक ओलांडून तब्बल 3 हजार 670 वर उडी घेतली आहे. आजच्या रुग्ण संख्येत शहरातील 17 रुग्णांचा समावेश आहे. तर गुंजाळवाडीत संक्रमण वाढीची प्रक्रिया आजही सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातील रुग्णगती प्रति दिवस 51 वर जावून पोहोचली होती, त्यामुळे एकट्या सप्टेंबरमध्येच तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 531 रुग्णांची भर पडली होती. महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रुग्णवाढीचा वेग कायम राहील्याने उगवणारा ऑक्टोबरही धक्के देणाराच असेल असाच काहीसा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दररोज सत्तरीच्या पुढे जाणार्‍या रुग्णसंख्येत जवळपास निम्मी घट झाली. त्यानंतर 2 ऑक्टोबररोजी 51 रुग्ण व 7 ऑक्टोबररोजी 53 रुग्ण वगळता उर्वरीत सात दिवसांत संगमनेरातील बाधितांची रोजची संख्या पन्नाशीच्या आंतच राहीली. गेल्या आठ दिवसांचा विचार करता तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत सरासरी 43.25 रुग्णगतीने 346 रुग्णांची भर पडली होती. मात्र आज बाधितांच्या संख्येने ऑक्टोबर महिन्यातील पहिला विक्रम नोंदवित तब्बल 74 रुग्णांची भर घातल्याने तालुक्याची सरासरी रुग्ण गतीही उसळी घेत 46.66 टक्क्यांवर पोहोचली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून दोघांचे, खासगी प्रयोगशाळेकडून 20 जणांचे, तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून बावन्न जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात संगमनेर शहरातील 17 रुग्णांचा समावेश आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील जानकीनगर परिसरात राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, पावबाकी रस्त्यावरील 58, 25 व 23 वर्षीय महिलांसह 30 वर्षीय तरुण, विठ्ठल नगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सदाशंकर नगर मधील 33 वर्षीय तरुण, कुरण रोड वरील 50 वर्षीय महिला, शिवाजी नगर मधील 21 वर्षीय महिला, संगमनगर मधील 80 व 53 वर्षीय इसमासह 38, 30 व 29 वर्षीय तरुण, खांजापुर मधून 19 वर्षीय तरुण, सुकेवाडी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 30 वर्षीय तरुण, तसेच 12 वर्षीय बालिका, संगमनेर खुर्द येथील 61 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 22 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 48 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण व 60 वर्षीय महिला, हंगेवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 32 वर्षीय तरुण,

घारगाव येथील 40 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 63 व 42 वर्षीय महिलेसह 21 वर्षीय तरुणी व 20 वर्षीय तरुण, निमगाव भोजापूर येथील 37 व 28 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 55 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 55 वर्षीय इसम, रहिमपूर येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, औरंगपूर येथील 43 व 19 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 35 व 27 वर्षीय तरुण, बोटा येथील 20 वर्षीय तरुणी, माळवाडी येथील 50 वर्षीय महिलेसह 44 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 70 वर्षीय महिला, अकलापुर मधील 45 वर्षीय इसम, कुरकुटवाडी येथून 40 वर्षीय तरुण, झोळे येथील 23 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 40 वर्षीय महिला, आनंदवाडी येथील 28 वर्षीय तरुण, खराडी येथील 49 वर्षीय इसम, कुरकुंडी येथील 68 वर्षीय महिला,

पेमगिरी येथील 50 वर्षीय इसम, नांदूर खंदरमाळ येथील 65 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 51 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 51 वर्षीय इसम, तर आज गुंजाळवाडीत कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. तेथून आज तब्बल 11 रुग्ण समोर आले आहेत. त्यात 62 व 57 वर्षीय इसमासह 31, 24 व 24 वर्षीय तरुण, 60, 53, 45 व 29 वर्षीय महिलांसह तीन वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आज तालुक्याच्या रुग्ण संख्येत विक्रमी रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांनी 36 वे शतक ओलांडून 3 हजार 670 रुग्णसंख्या गाठली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज 745 रुग्णांना उपचारांतु डिस्चार्ज देण्यात आला. आता जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील सरासरी प्रमाण आता 89.78 टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येत 511 बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या 4 हजार 304 झाली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून 117, खाजगी प्रयोगशाळेकडून 126 आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतून 268 अशा एकूण 511 जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 45, अकोले 15, जामखेड 03, कर्जत 04, कोपरगाव 08, नगर ग्रामीण 14, नेवासा 02, पारनेर 05, पाथर्डी 03, राहाता 03, राहुरी 03, श्रीगोंदा 06, लष्करी रुग्णालयातील 05 व अन्य जिल्ह्यातील एकासह एकशे सतरा जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले आहे.

खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातून जिल्ह्यातील 126 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 46, अकोले 01, जामखेड 03, कर्जत 02, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 15, नेवासा 09, पारनेर 03, पाथर्डी 06, राहाता 09, राहुरी 12, संगमनेर 07, शेवगाव 03 व श्रीरामपूर येथील 08 रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीतूनही 268 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 17, अकोले 14, जामखेड 23, कर्जत 17, कोपरगाव 08, नेवासा 09, पारनेर 10, पाथर्डी 46, राहाता 12, राहुरी 17, संगमनेर 53, शेवगाव 14, श्रीगोंदा 07 व श्रीरामपूर येथील 11 रुग्णांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 136, अकोले 32, जामखेड 63, कर्जत 47, कोपरगाव 19 नगर ग्रा. 47, नेवासा 44, पारनेर 35, पाथर्डी 43, राहाता 49, राहुरी 39, संगमनेर 70, शेवगाव 44, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 41 व लष्करी रुग्णालयातील 08 रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यात बरे झालेली रुग्णांची एकूण संख्या : 44 हजार 603..
  • जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 4 हजार 304..
  •  जिल्ह्यात  आज पर्यंत  झालेले  एकूण मृत्यू : 771..
  • जिल्ह्यातील  आजपर्यंतची एकूण रूग्ण संख्या : 49 हजार 678..
  • जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण 89.78 टक्के..
  • आज जिल्ह्यातील 745 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 511 बाधितांची नव्याने भर पडली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *