मोटारसायकल चोरणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई; पाच आरोपी संगमनेर तालुक्यातील


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे ग्रामणी, अहमदनगर व ठाणे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला गजाआड करण्यात पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहेत. यातील पाच आरोपी हे संगमनेर तालुक्यातील आहेत. या कारवाईत दहा लाख रुपयांच्या 29 मोटारसायकली जप्त करुन नऊ जणांना अटक केली आहे.

याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमोल नवनाथ मधे (रा. वाघवाडी, पोखरी, ता. पारनेर), विजय संजय मधे (रा. निमदरी, ता. पारनेर), संतोष उमेश मधे (रा. केळेवाडी, पोखरी-पवळदरा), संदीप सुभाष मधे (रा. केळेवाडी, कातळमाळ, ता. संगमनेर), विकास साहेबराव मधे (रा. पवळदरा-मधेवस्ती, पोखरी), विजय विठ्ठल जाधव (रा. कुरकुंडी, ता. संगमनेर), सुनील वामन मेंगाळ (रा. धरणमळई वाडी-बोटा, ता. संगमनेर), भारत पोपट मेंगाळ (रा. गारोठे पठार, ता. संगमनेर), मयूर गंगाराम मेंगाळ (रा. आंबीदुमाला, ता. संगमनेर) यांना पकडून त्यांच्याकडून दहा लाख रुपयांच्या 29 मोटारसायकली जप्त करुन अटक केली आहे. यापैकी पाच आरोपींना नारायणगाव, चार आरोपींना ओतूर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, हवालदार दीपक साबळे, नाईक संदीप वारे, जवान अक्षय नवले या पथकाला मोटारसायकल चोरी करणारे आंतरजिल्हा टोळीची गोपनीय माहिती मिळाली होती. दोन्ही तपास पथकांनी संयुक्त कारवाई करीत अहमदनगर जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन प्रमुखांसह नऊ जणांना जांबुत फाटा येथून ताब्यात घेतले होते. पुढील तपासात आरोपींकडून नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीतील चार, घोडेगावातील पाच, ओतूरचे तीन, जुन्नरमधील तीन, मंचर, खेड व अकोले हद्दीतील प्रत्येकी दोन, रांजणगाव, शिरुर, आश्वी, लोणी, टोकावडे, हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण 26 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक उपनिरीक्षक तुषार पंदारे, हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश धिगळे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, नाईक संदीप वारे, जवान अक्षय नवले सहायक उपनिरीक्षक मुकुंद कदम, अक्षय सुपे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *