यश मिळवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची आवश्यकता ः डॉ. मुळे संगमनेर महाविद्यालयात स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी संस्कृतात्मा पुरस्कार वितरण


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संस्कृत भाषेला भारतीय इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पूर्व संस्कृतीच्या अध्ययनासाठी तिचे संशोधन होणे खूप आवश्यक आहे. कारण संस्कृत भाषा ही आपल्या देशात दोन हजार पेक्षाही जास्त वर्षांपासून अध्ययनामध्ये आहे. आज संस्कृत भाषेच्या संशोधनासाठी आपल्या देशात अनुकूल वातावरण आहे. संस्कृत भाषेच्या विद्यार्थ्यांनी, संशोधनात स्वतःला झोकून देऊन, चिकित्सकवृत्तीने अध्ययन करावे. स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे, प्रत्येकाला सोबत घेऊन जाणारे होते. त्यामुळे आपले संशोधन हे सर्वांना सोबत घेऊन, जाणारे असावे, असे मत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, संगमनेर महाविद्यालयात संस्कृतात्मा ओंकारनाथ मालपाणी संस्कृत संशोधन केंद्र संगमनेर महाविद्यालय यांच्याद्वारा संस्कृत वाङ्मयनिर्मिती व प्रचारकार्यार्थ दिला जाणारा संस्कृतात्मा पुरस्कार स्वीकारताना डॉ. रवींद्र मुळे यांनी व्यक्त केले.

यावेळी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, आपल्या देशात संस्कृत भाषेला खूप मोठी परंपरा लाभली आहे. आधुनिक विकासाची बीजे स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या विचारात होते. संस्कृत साहित्यातूनच आधुनिक नवनिर्मितीला चालना मिळते आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्न पाहावीत या स्वप्नातल्या प्रत्येक कणात ध्येय भिनले पाहिजे. भाषेतल्या गुणांचे चिंतन प्रत्येकाने केले पाहिजे. असेही ते म्हणाले. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, जनरल सेक्रेटरी सीए. नारायण कलंत्री, सचिव डॉ. अनिल राठी, कोषाध्यक्ष राजकुमार गांधी, संतोष कारवा, सुवर्णा मालपाणी (विश्वस्त मालपाणी चॅरिटेबल ट्रस्ट), रेखा मुळे, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, डॉ. अनिरुद्ध मंडलिक आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी म्हणाले, भावी काळातही संस्कृतचे अध्ययन संशोधन होणे गरजेचे आहे. संस्कृत भाषेचे संवर्धन ही काळाची गरज आहे. संशोधक विद्यार्थ्याने गुणवत्तेविषयी कोणतीही तडजोड स्वीकारू नये. आपल्या विषयात श्रद्धेने अध्ययन करावे. संस्कृत संवर्धनाची सुरुवात आपण संगमनेरपासून केलेली आहे. त्यामुळे जगाच्या नकाशा संगमनेरचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधनासाठी चांगल्या साहित्याचे वाचनही करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पाहुण्यांचा परिचय, सत्कार निवेदन डॉ. रोशन भगत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. सत्कारमूर्तीच्या मानपत्राचे वाचन व कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. अनिरुद्ध मंडलिक यांनी केले. यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *