गीता परिवाराच्या संगमनेर शाखाध्यक्षपदी संजय कर्पे शोभा बाहेती यांची उपाध्यक्षपदी तर अभिजीत गाडेकर यांची सचिवपदी निवड


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळापासून बालसंस्कार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या गीता परिवाराच्या संगमनेर शाखेतील पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संगमनेर शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संजय कर्पे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी शोभा बाहेती, सचिवपदी अभिजीत गाडेकर आणि कोषाध्यक्षपदी अमित चांडक यांच्या निवडीही एकमताने करण्यात आल्या आहेत.

गीता परिवाराच्या संस्कार बालभवनात पार पडलेल्या वार्षिक बैठकीतून पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत संगमनेर केंद्र पालक व जिल्हा विस्तारक पदासाठी गणेशलाल बाहेती, केंद्र विस्तारप्रमुखपदावर कुंदन जेधे, सतीष इटप, अर्जुन युवा मंच प्रमुखपदावर पूजा दिक्षीत, परिवार संपर्क समितीच्या प्रमुखपदी सरोज आसावा, परिवार संपर्क समिती सदस्य रुक्मिणी लढ्ढा, संध्या ढोले, शकुंतला दायमा, रुपाली रायकर, प्रणिता बेल्हेकर व सुनंदा जाजू यांची निवड करण्यात आली.

तर, विद्यालय संपर्क प्रमुखपदी शंकर सातपुते, वैभव कुलकर्णी, दर्शन जोशी व भोलेश्वर गिरी यांची निवड झाली आहे. पुढील तीन वर्ष नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. गीता परिवाराकडून गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळापासून विविध उपक्रमशील व संस्कारशील उपक्रम राबविले जातात. हजारो विद्यार्थ्यांना योगासने, सूर्यनमस्कार यांसह श्रीमद्भगवद्गीता शिकवून तेजस्वी, विचारी व राष्ट्रभक्त पिढी घडविण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे. संगमनेरातील जाणता राजा मैदानावर राष्ट्रीय योग महोत्सव आणि राष्ट्रीय गीता महोत्सव असे दोन भव्य-दिव्य उपक्रम हजारोंच्या उपस्थितीत अविस्मरणीय ठरले आहेत. प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत होणारा संस्कार वाटिका उपक्रम विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा ठरला आहे. गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज व डॉ. संजय मालपाणी यांनी नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *