नामदार बाळासाहेब थोरात क्रिकेट प्रीमियम लीगचा थरार भरघोस बक्षिसे; 1 लाख 21 हजार 111 रुपयांचे पहिले बक्षीस


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर हे उपक्रमशील शहर व तालुका आहे. तरुणांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्यावतीने सलग नवव्या वर्षी नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग अंतर्गत नामदार चषक सुरू झाला असून संगमनेरमधील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने या लीगचा थरार अनुभवत आहेत.

जाणता राजा मैदान येथे राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्यावतीने नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग नामदार चषकाचा शुभारंभ कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात व टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. हसमुख जैन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, राजेश मालपाणी, कांचन थोरात, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख यांनीही भेट दिली आहे.

या प्रीमियर लीगमध्ये साई छत्रपती राहुल राऊत 11, महेंद्रशेठ गोडगे पाटील तळेगाव, आयुष वडगाव पान, अजय फटांगरे 11 सारोळे पठार, मोरया चिकणी, योद्धा साई ट्रेडर्स, संगमनेर राजे उमाजी नाईक, गौरव डोंगरे 11 बोटा, रुद्र 11 कोल्हेवाडी शिरसाट स्पोर्ट्स मनोली, राजे उमाजी नाईक वेल्हाळे, त्रिमूर्ती वॉरियर्स वडगाव पान, आदर्श साईराज, साईरत्न जयभद्रा राजापूर, खंडूअण्णा सुकेवाडी, साकूर नाईट रायडर या 16 संघांनी आयपीएलच्या धरतीवर सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक संघाला वेगवेगळ्या रंगाचा पोशाख असून जाणता राजा मैदानावर भरगच्च उभारलेले स्टेज, मैदानाच्या चोहोबाजूंनी केलेले सुशोभीकरण, आकर्षक बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, एलईडी स्क्रीन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, खेळाडूंसाठी स्वतंत्र पॅव्हेलियन याचबरोबर बाहेरून आलेल्या संघांसाठी राखीव कक्ष, राष्ट्रीय स्तरावरील पंच आणि या सामन्यांचे प्रक्षेपण यामुळे ही स्पर्धा जिल्हा पातळीवर भव्य दिव्य असणारी पहिली मोठी स्पर्धा ठरली आहे.

या स्पर्धेत के. के. थोरात यांनी 1,21,111 रुपये व चषक, द्वितीय 71,111 व चषक, डॉ. निजानंद खामकर व शतानंद खामकर यांनी दिले आहे. तृतीय पारितोषिक 51,111 व चषक आर. एम. कातोरे व इंजिनियर निखील कातोरे यांनी दिले आहे. चतुर्थ बक्षीस 33,333 व चषक अजय फटांगरे यांनी दिले आहे. याचबरोबर विजेता संघ मालकाला राजेश मालपाणी यांच्याकडून पल्सर गाडी, उपविजेत्या संघ मालकाला नवनाथ आरगडे यांच्याकडून एलईडी टीव्ही आणि तृतीय क्रमांकाच्या संघ मालकाला दीपक करंजकर यांच्याकडून रेसर सायकल दिली जाणार आहे. याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, षटकार, हॅट्रीक, सर्वोत्कृष्ट आयडॉल, उत्कृष्ट संघ अशी विविध पारितोषिकही दिली जाणार आहेत. पहिल्या दिवशी या स्पर्धेत त्रिमूर्ती वॉरियर वडगाव पण संघाने आदर्श साहित्यरत्न जयभद्रा राजापूरवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजवर्धन यूथ फाऊंडेशनचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *