एसएसके फाउंडेशनचे काम समाजासाठी दिशादर्शक ः शेळके कळसूबाई विद्यालयाच्या 250 विद्यार्थ्यांना डेस्क किटचे वितरण


नायक वृत्तसेवा, अकोले
एएसके फाउंडेशन आणि बायफ अत्यंत दखलपात्र आणि सामाजिक काम करत आहे. त्यांचे हे काम नक्कीच समाजासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार अकोलेचे गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी काढले.

मुंबई पुरस्कृत व बायफ संचलित समृद्धग्राम प्रकल्पांतर्गत जहागिरदारवाडी येथील कळसूबाई विद्यालयात अडीचशे विद्यार्थ्यांना आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी खास तया केलेले डेस्क किट वितरित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना या किटचा उपयोग शाळेत दप्तर आणण्यासाठी व घरी अभ्यास करण्यासाठी होणार आहे. सुमारे सहाशे रुपये किमतीचे एक किट आहे. विद्यार्थ्यांच्या हातात हे किट पडल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी एएसके फाउंडेशनचे सिद्धार्थ अय्यर, प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने, बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे, जलतज्ज्ञ रामनाथ नवले, कळसूबाई विद्यालयाचे प्राचार्य आर. सी. जाधव, शिक्षक रामचंद्र कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना प्रकल्पामार्फत देण्यात येणारी मदत बहुमूल्य असून या किटचा उपयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी नियमितपणे केला पाहिजे. विद्यार्थ्यांना शेती आणि शेतीशी निगडित विविध विषयांचे तंत्रज्ञान प्रकल्प अवगत करून देत आहे याचे विशेष कौतुक आहे. या वयात विद्यार्थ्यांना शेतीविषयक दर्जेदार ज्ञान प्राप्त होत असल्याचे बघून गटविकास अधिकारी राहुल शेळके यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाण संवर्धन, वृक्ष लागवड, पर्जन्यमापन, परसबाग, डिजिटल स्कूल, वाचनालय, रोपवाटिका आदी उपक्रमांतून विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनविण्यात प्रकल्पाचा मोठा वाटा आहे असेही त्यांनी आवर्जुन नमूद केले. बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी प्रास्ताविक केले तर रामचंद्र कानवडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळसूबाई माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. बायफचे विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, मच्छिंद्र मुंढे, वर्षा भागडे, सुनील बिन्नर, गोरक्ष देशमुख यांनीही कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *