कुकाणा येथे गाळ्याच्या वादातून तुंबळ मारहाण नेवासा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादींवरुन गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील कुकाणा येथे दुकान गाळ्याच्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. याबाबत दाखल परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही बाजूच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विजय पोपटलाल गांधी (वय 55, रा. मारुती मंदिराजवळ कुकाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महंमद कलिंदर इनामदार (रा. जेऊरहैबती, ता. नेवासा) यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता.14) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गांधी हे गाळ्याजवळ साफसफाई करत असताना इनामदार याने तेथे जाऊन हा गाळा माझा आहे, असे म्हणाला असता गांधी यांनी त्यास समजावून सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने लाकडी दांड्याने गांधी यांच्या डाव्या हातावर व पोटरीवर मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 41/2023 भारतीय दंडविधान कलम 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत.

दुसरी फिर्याद महंमद कलिंदर इनामदार (वय 55, रा. जेऊर हैबती ता. नेवासा) यांनी दिली आहे. इनामदार यांनी गांधी यांना भाड्याने दिलेली टपरी मला धंद्याकरिता पुन्हा मला द्या, असे म्हणाले असता त्याचा त्यांना राग आल्याने बाळासाहेब गांधी याने त्याच्या हातातील काहीतरी धारदार हत्याराने उजव्या पायाच्या नडघीवर मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रज्हिटर 42/2023 भारतीय दंडविधान कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *