पेटीटमध्ये तब्बल 44 वर्षांनंतर स्नेहमिलन उत्साहात माजी विद्यार्थ्यांनी जागविल्या बालपणाच्या आठवणी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील सर. डी. एम. पेटीट हायस्कूलधील 1978 च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. येथील मालपाणी बँक्वेट हॉलध्ये संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम संपन्न झाले. विशेष म्हणजे या स्नेहसंमेलनासाठी या विद्यार्थ्यांचे गुरुजन द्वारकानाथ राठी, श्रीनिवास दसरे, संताजी कर्पे, मेहेत्रे सर आवर्जुन उपस्थित होते.

शाळेची घंटा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘या कुंदेंदु तुषार हार धवला’ ही सरस्वती प्रार्थना म्हटली. त्यानंतर 1978 ते 2022 ही 44 वर्षांची वाटचाल या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या संमेलनाचे सूत्रसंचालन रवींद्र एरंडे यांनी केले. संमेलनाचे अध्यक्षपद दीपक मणियार यांनी भूषविले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग पगडाल यांनी केले. व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन यावेळी सादर करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुनील दिवेकर, डॉ. मुकुंद गाडगीळ, राजकुमार लाहोटी व सतीष दुर्गुडे यांनी केले. आमचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात यशस्वी ठरल्यामुळे अभिमान वाटत असल्याचे मनोगत गुरुजनांनी व्यक्त केले.


संमेलनादरम्यान गमतीजमतीही घडल्या. उशीरा आलेल्या, बडबड करणार्‍या विद्यार्थ्यांना गमतीदार शिक्षाही करण्यात आल्या. तर याप्रसंगी लहानपणाच्या विविध खेळांचे साहित्य, गोट्या, विटी दांडू, लेझीम, चेंडू, बॅट, शाईपेन, दौत, चिंचा, बोरे अशा विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले. समारोपप्रसंगी शिक्षकांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हे स्नेहसंमेलन संपन्न झाले. याप्रसंगी कुलजीत छाबडा, अनिल टाक, सीए. जयंत कोळपकर, अ‍ॅड. दीपक परदेशी, शेखर साबळे, चरणजीत पंजाबी, अशोक जनवेजा, अरुण लोणकर, सुनील चांडक, डॉ. संजय ढोले, गुरुबचन बत्रा, डॉ. चंद्रशेखर दिवेकर, दिलीप वामन, प्रा. विकास वैद्य, प्रवीण वडनेरे, शंकर आनलदास, अ‍ॅड. अनिल कासार, सतीष सांगळे, सुनील भांडगे, सुभाष मुर्तडक, मुकेश राजपाल, विकास मुळे, दिलीप कुलकर्णी, शिवाजी गुंजाळ सुनिल मानकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समितीचे सदस्य दीपक मणियार, पांडुरंग पगडाल, रवींद्र एरंडे, सुनील दिवेकर, डॉ. मुुकुंद गाडगीळ, राजकुमार लाहोटी, अरविंद गाडेकर व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *