सुकेवाडीतील गोसावी कुटुंबाला किराणा किटचे वाटप यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून राबविला उपक्रम


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दीपावलीच्या दिवशी झालेल्या पावसाने सुकेवाडी येथील अल्पभूधारक शेतमजूर भाऊसाहेब लहानू गोसावी यांच्या घराची पूर्ण पडझड झाली. या कुटुंबाला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून या परिवाराला यशोधन कार्यालयाच्यावतीने किराणा किट देण्यात आली आहे.

सुकेवाडी येथे भाऊसाहेब गोसावी यांच्या घराची पाहणी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केली. यावेळी शरद गिरी, सरपंच भाऊसाहेब कुटे, दशरथ गोसावी, भागवत भारती, माधव पुरी, संतोष पुरी, प्रदीप गोसावी, सोमनाथ गोसावी, रणजीत गिरी, गणेश गोसावी, चंदन गोसावी, प्रवीण गोसावी, लक्ष्मण भारती, निखील गोसावी, अनिल गोसावी, यमन गोसावी, राजाराम गोसावी व गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना इंद्रजीत थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवरील गोरगरिबाच्या विकासासाठी काम केले जात आहे. यावर्षी तालुक्यात अनेक ठिकाणी जास्त पाऊस झाला असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर गोरगरिबांच्या घरांच्या पडझडी झाल्या आहेत. अशा नुकसानग्रस्त शेती व पडझड झालेल्या घरांची प्रशासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरीत भरपाई दिली पाहिजे. तसेच आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने घरकुल मिळून देण्यासाठी काम केले जाईल असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *