दीपावली हे आनंद व प्रकाशाचे पर्व ः थोरात थोरात कारखान्यासह विविध सहकारी संस्थांचे लक्ष्मीपूजन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात अनेक अडचणी व संघर्ष असतात. याला आपण सातत्याने सामोरे जातो यालाच आपण जीवन म्हणतो. मात्र या दररोजच्या संघर्षमय जीवनातून वेगळा असणारा हा दिवाळीचा कालखंड असतो. तो सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा होत असून दीपावली हे आनंदाचे व प्रकाशाचे पर्व असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, शॅम्प्रो, राजहंस कंपनी, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, जिल्हा बँक या विविध सहकारी संस्थांचे लक्ष्मीपूजन झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, संपत डोंगरे, गणपत सांगळे, अमित पंडित, संतोष हासे, राजेंद्र चकोर, सुनील कडलग, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, राजेंद्र गुंजाळ, सुभाष सांगळे, संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, संपत गोडगे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, रामदास वाघ, संभाजी वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून दिवाळी मोठ्या आनंदात सर्वजण साजरी करत आहेत. जीवनात अनंत अडचणी असतात. मात्र दिवाळीचा कालखंड हा आनंदाचा असतो. हे एक आनंदाचे पर्व आहे. थोरात कारखान्याने मागील वर्षी विक्रमी गाळप केले असून विद्युत निर्मिती, इंडस्ट्रियल अल्कोहोलचे चांगले उत्पादन केले आहे. याचबरोबर ऊस उत्पादकांना भाव दिला आहे. ऊस उत्पादकांना चांगला भाव, कामगारांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान याचबरोबर अमृत उद्योगात समूहातील सर्व संस्थांमुळे बाजारपेठही फुलली आहे. यंदाची ही दिवाळी सर्वांना आनंदाची व आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छाही आमदार थोरात यांनी दिल्या. प्रास्ताविक उपलेखापाल अमोल दिघे यांनी केले तर संदीप दिघे यांनी आभार मानले. यावेळी शरद देशमुख, कैलास वर्पे, किशोर पुजारी, बादशाह सोनवणे आदिंसह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी विनोद राऊत व स्वप्नाली राऊत, प्रकाश पारखे, नीलेश गायकवाड यांचा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *