भाजप युवामोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.डेरे

भाजप युवामोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.डेरे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जनता पक्षाची उत्तर नगर जिल्हा नूतन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीमध्ये भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्षपदाची धुरा संगमनेर तालुक्यातील युवा नेते अ‍ॅड.श्रीराज भानुदास डेरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


अ‍ॅड.डेरे यांनी यापूर्वी युवामोर्चा संगमनेर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांच्या याच कामाची दखल भाजप प्रदेशाने व जिल्ह्याने घेऊन त्यांच्यावर युवामोर्चाची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, अ‍ॅड.डेरे हे मूळ धांदरफळमधील डेरेवाडी येथील रहिवाशी असून डॉ.भानुदास डेरे यांचे चिरंजीव आहेत. अ‍ॅड.डेरे हे मूळ हिंदुत्त्ववादी विचारधारेचे असून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई येथून एक वर्षाचे राजकीय प्रशिक्षण घेतलेले आहे. तसेच त्यांनी विधी शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. सदर पद दिल्याबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी मंत्री प्रा.राम शिंदे माजी, माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रदेश सदस्य भानुदास बेरड, किशोर काळकर आदिंचे आभार व्यक्त करुन भाजप युवामोर्चाच्या कामाचा विस्तार संपूर्ण जिल्ह्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *