शेतकर्‍यांनी शाश्वत ऊस पिकाची जास्त लागवड करावी ः ओहोळ

शेतकर्‍यांनी शाश्वत ऊस पिकाची जास्त लागवड करावी ः ओहोळ
सहकारमहर्षी थोरात कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारमहर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शतत्वावर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारासह तालुक्यात सातत्यपूर्ण विकासाची वाटचाल सुरू आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून ऊस हे शाश्वत पीक असल्याने शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-2021 या गळीत हंगामातील बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.माधव कानवडे होते तर व्यासपीठावर बाजीराव खेनमर, इंद्रजीत थोरात, शिवाजी थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मण कुटे, शंकर खेमनर, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, साहेबराव गडाख, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, विशेष लेखा परीक्षक राजेंद्र देशमुख, सुरेश थोरात, शांताबाई खैरे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल काळे व त्यांच्या पत्नी लता काळे, शेखर वाघ व त्यांच्या पत्नी मंदा वाघ, दादासाहेब कुटे व त्यांच्या पत्नी सोनाली कुटे, विनोद हासे व त्यांच्या पत्नी वैशाली हासे, डॉ.तुषार दिघे व त्यांच्या पत्नी सुरेखा दिघे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न झाले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *