लायन्स क्लब ऑफ संगमनेरला अकरा पारितोषिकांचा मान पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चषक प्रदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबच्या 3234 डी 2 या प्रांताचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ संगमनेरला विविध प्रकाराची 11 पारितोषिके मिळाली असल्याची माहिती क्लबचे प्रसिध्दी प्रमुख राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली.

वर्षभरात लायन्स क्लबने केलेल्या कार्याचा आढावा घेऊन उल्लेखनीय कार्य करणार्‍या क्लबचा व पदाधिकारी यांचा आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चे प्रांतपालांच्यावतीने गुणगौरव करण्यात येतो. प्रांतपाल हेमंत नाईक यांनी या वर्षाचा उत्सव पॅशनेट अवार्ड नाईट हा समारंभ बंटारा भवन बाणेर पुणे येथे आयोजित केला होता. पुणे, अहमदनगर व नाशिक या भागातील लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ संगमनेरला फिरता चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर क्लबने सेवा कार्य प्रातांमध्ये तिसरे तर प्रशासकीय कार्यात पाचवे मानांकन मिळविल्याबद्दल खास चषक देऊन गौरविण्यात आले.

डॉ. सूचित गांधी यांना पॅशनेट आयकॉन कॅबिनेट ऑफिसर, ललित देसाई यांना पॅशनेट सुपरस्टार कॅबिनेट ऑफिसर तर श्रीनिवास पगडाल यांना लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डग्लस लेक्सझंडर यांचे सर्टिफिकेट ऑफ एप्रिशिएशनसह पॅशनेट सुपरस्टार झोन चेअरमन म्हणून चषक देऊन सन्मानित करण्यात आले. राखी करवा यांना पॅशनेट आयकॉन सचिव तर पूनम मुंदडा यांना पॅशनेट आयकॉन खजिनदार व बेस्ट खजिनदार आणि सुनीता पगडाल यांना पॅशनेट आयकॉन अध्यक्ष म्हणून चषक देऊन गौरविण्यात आले. लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने अध्यक्षा सुनीता पगडाल, राखी करवा, झोन चेअरमन श्रीनिवास पगडाल, कॅबिनेट ऑफिसर डॉ. सूचित गांधी, संजय आसावा, माजी अध्यक्ष बबिता आसावा आदी सदस्य उपस्थित होते. प्रांतपाल हेमंत नाईक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मल्टिपल कौन्सिल चेअरमन विवेक अभ्यंकर, लायन्स क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, राजकुमार राठोड, दीपक शाह, द्वारका जालान, श्रीकांत सोनी यांसह अनेक माजी प्रांतपाल उपस्थित होते. या समारंभात मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर करण्यात आले. या यशाबद्दल आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, डॉ. राजन ठाकूर, हिरालाल पगडाल, बापूसा टाक, राजेंद्र सोमाणी, केदारनाथ राठी आदिंनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *