आईच्या स्मृतीदिनी वृद्धाश्रमात मिष्टान्न अन्नदान

आईच्या स्मृतीदिनी वृद्धाश्रमात मिष्टान्न अन्नदान
नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक स्वर्गीय प्रभाकर बडवे (गुरुजी) यांच्या पत्नी व सद्या पुणे येथील स्थायिक असलेले भारतकुमार बडवे यांनी आपल्या मातोश्री सुमित्रा बडवे यांच्या स्मृतीदिनी नेवासाफाटा येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान करून आईच्या स्मृतीदिनी खर्‍या अर्थाने श्रद्धांजली अर्पित केली.


नेवासा येथील मोहिनीराज देवस्थानचे पुजारी व हल्ली पुणे येथे राहत असलेले भारतकुमार बडवे यांनी या अगोदरही आपले पिताश्री कै.प्रभाकर बडवे (गुरुजी) यांच्या स्मरणार्थ मिष्टान्न भोजन देऊन अन्नदान केले आहे. बडवे यांचा कार्याचा आदर्श समाजाने देखील घ्यावा, असे आवाहन वृद्धाश्रमाचे प्रमुख रावसाहेब मगर यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी कै.सुमित्रा प्रभाकर बडवे यांना सर्व वृद्धाश्रम समिती व वृद्धांच्यावतीने श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. आईच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान केल्याबद्दल वृद्धाश्रमचे चालक रावसाहेब मगर, समितीचे अध्यक्ष बाळासाहेब देवखिळे, पत्रकार सुधीर चव्हाण, संतोष मगर तसेच समिती संचालक मंडळाने बडवे कुटुंबाला धन्यवाद दिले. तर शेवटी व्यवस्थापक सर्जेराव काळे यांनी आभार मानले.

One thought on “आईच्या स्मृतीदिनी वृद्धाश्रमात मिष्टान्न अन्नदान

  • August 21, 2020 at 3:24 pm
    Permalink

    Your Ghargaon based reporter, Mr. Navnath Gadekar has published news in todays dated 21 jul 2020 evening time news, given incorrect information about 2 COVID patient found at “KURKUNDI” ( my village), however this is not indeed the case, instead it is “KURKUTWADI” I think so, plz ask him to correct it and apologize for the same,

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *