चंदुकाका सराफ आणि अहमदनगरवासियांचे अतूट नाते निर्माण होईल ः पद्मश्री पवार चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि.च्या अहमदनगर सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ

नायक वृत्तसेवा, नगर
195 वर्षे शुध्दता, परंपरा, विश्वास, पारदर्शकता आणि नाविन्यता या पंचसूत्रीच्या भक्कम पायावर उभ्या राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या प्रसिद्ध चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि.च्या 20 व्या सुवर्ण दालनाचा शुभारंभ अहमदनगर येथे संपन्न झाला. पिढ्यानपिढ्या विश्वासावर कार्यरत असलेल्या या सुवर्णपेढीची वाटचाल अतिशय नोंद घेण्यासारखी आहे. अहमदनगर सारख्या संपन्न अशा शहारात चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि. या पेढीचे व अहमदनगरवासियांचे अतूट नाते निर्माण होईल असे उद्गार हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.

बारामतीची एकमेव सुवर्णपेढी असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. यांच्या 20 व्या अहमदनगर शाखेच्या शुभारंभ प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार नीलेश लंके, महापैार रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, बाजार समितीचे सभापती अभिलाष धिगे, बाळासाहेब जगताप, उद्योजक गौतम मुनोत, सथ्था कॉलनीचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, आदेश चंगाडिया, सुधीर तावरे, संजय गुगळे, अशोक ठोंबरे, आरोग्य कॉलेजचे प्राचार्य माणिक विधाते, चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स् प्रा. लि.चे संचालक आदित्य शहा, सम्यक शहा, शीतल पाटील, निकेत फडे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाखेमध्ये वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन या लग्नाकरिता परिपूर्ण अशा दागिन्यांच्या प्रशस्त स्वतंत्र दालनाचा शुभारंभही झाला.

समृध्दता, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सहकार, धार्मिक वारसा लाभलेल्या अहमदनगर शहरात सुरू होणारी चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि.ची ही विसावी शाखा आहे. बारामतीचे शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी उपलब्ध करण्यात आली आहेत. यानिमित्ताने चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सुवर्णपेढीने अत्यंत जबरदस्त ऑफर्स अहमदनगरवासियांना सादर केल्या होत्या. यातील पहिल्या ड्रॉची सोडत महापैार रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये लॅपटॉपचे विजेते ठरले आनंद भैरूमल कांकरिया, टॅबचे विजेते ठरले कल्याणी विजय कोथिंबिरे, गिफ्ट व्हाऊचरचे विजेते ठरले भगवान शेळके, बाळू मिसाळ व मीरा थोरात. समृध्द आणि सुजलाम-सुफलाम अहदमनगर शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून शुध्दता आणि कलात्मकतेचा वारसा घेऊन बारामतीचे एकमेव सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि. आता अहमदनगरवासियांच्या सेवेत रूजू होत आहेत. अहमदनगरवासियांच्या हक्काचं चंदुकाका सराफ अ‍ॅन्ड सन्स प्रा. लि.हे सुवर्ण दालन ठरेल असा विश्वास आदित्य शहा व सम्यक र शहा यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *