नेवाशात सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

नायक वृत्तसेवा, नेवासा
ठाणे महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर कर्तव्य बजावत असताना अत्यंत तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा मंगळवारी (ता.31) नेवासा नगरपंचायतच्यावतीने कामबंद ठेऊन निषेध करण्यात आला.

नगरपंचायतचे अधिकारी व कार्यालयीन कर्मचार्‍यांनी अत्यावश्यक सेवा वगळून काम बंद आंदोलन केले. हल्लेखोराला त्वरीत अटक करून कडक कारवाईची मागणी करण्यात आली. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे संपूर्ण तुटून पडली व त्यांच्या डोक्यावर जबर वार झाला. तसेच अंगरक्षक पालवे यांचे बोट तुटून पडले आहे. इतक्या क्रूर पद्धतीने त्यांना मारहाण झाली याचा नेवासा नगरपंचायतीच्यावतीने निषेध करण्यात आला. तर भ्याड हल्ले करणार्‍यावर तातडीने कायदेशीर करावी, अशी मागणी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, कार्यालयीन अधीक्षक रवींद्रकुमार गुप्ता यांसह कर्मचार्‍यांच्यावतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *