संगमनेर तालुक्याच्या पठाराभागातील कोविडचा उद्रेक थांबेना! आजही पठारावर आढळले एकसष्ट रुग्ण; पालिकेचे मुख्याधिकारीही झाले संक्रमित..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही नागरिकांच्या हलगर्जीपणामूळे संगमनेर तालुक्याच्या पठारभागात वाढलेल्या संक्रमणाचा स्तर आजही कायम असून आजच्या अहवालातून समोर आलेल्या 109 रुग्णांमध्ये पठारभागातील तब्बल 61 जणांचा समावेश आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे गुरुवारी साकूरमधील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात खालावली होती, मात्र आज साकूरमध्ये पुन्हा एका संक्रमणाने जोर धरला असून तेथून 32 रुग्ण समोर आले आहेत. एकीकडे पठारभागातील संक्रमणात दररोज वाढ होत असतांना दुसरीकडे शहरातील संक्रमण मात्र आटाक्यात आले आहे. आजच्या एकूण रुग्णांमध्ये शहरातील अवघ्या सहा जणांचा कोविडची लागण झाली असून त्यात संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांचाही समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 24 हजार 564 झाली आहे.


कोविड नियम लागू असतांनाही तालुक्याच्या पठारभागात शेकडों जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळे आणि दहाव्याचे विधी पार पडले. त्याचा सर्वाधीक फटका साकूर जिल्हा परिषद गटाला बसला असून या भागातील वीस गावांमधून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येवू लागले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता.29) पठारभागाच्या दौर्‍यावर आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी ‘लॉकडाऊन’चा शेवटा पर्याय वापरण्याची घोषणा करुन जिल्हा परिषदेचा साकूर गट शनिवार 31 जुलैपासून रविवार 08 ऑगस्टपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतांनाही आजच्या अहवालातही पठारभागातील सतरा गावे आणि वाड्यावस्त्या मिळून आज तब्बल 61 रुग्ण आढळले असून त्यात साकूर मधील 32 तर परिसरातील आठ अशा चाळीस रुग्णांचा समावेश आहे. पठारभागातील काही डॉक्टरांचा हलगर्जीपणाही वाढलेल्या संक्रमणाला कारणीभूत असून आता अशा डॉक्टरांवर उशीरा का होईना मात्र कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

आज शासकीय प्रयोगशाळेचे सात, खासगी प्रयागशाळेचे 67 व रॅपीड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून समोर आलेल्या 109 रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील 90, 75 व 31 वर्षीय महिलांसह 40, 38 व 22 वर्षीय तरुणांचा समावेश आहे. तर अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील 42 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. पठारभागातील साकूरमध्ये आजही मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर आले असून तेथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय तीन, 46 व 45 वर्षीय दोन इसम, 38, 32, 31 वर्षीय दोघे, 27, 26, 22 व 21 वर्षीय तरुण, 70, 48, 45 वर्षीय दोघी, 35, 31, 30, 27 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुणी, 14 वर्षीय दोन, 13 व 12 वर्षीय मुले आणि 11, 10 व सात वर्षीय मुलींचा समावेश आहे. याशिवाय मोरेवाडीतील 13 वर्षीय मुलगी, खंदरमाळ येथील 72, 67 व 35 वर्षीय महिला, 40 वर्षीय तरुण आणि 11 व सहा वर्षीय मुले,


एठेवाडीतील 35 वर्षीय तरुण, सावरगाव घुले येथील 21 वर्षीय तरुणी, कुंभारवाडीतील 37 वर्षीय तरुणासह 17 वर्षीय तरुणी, मांडवे येथील 80 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, शिंदोडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 38 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 79 वर्षीय महिलेसह 35 व 22 वर्षीय तरुण, घारगाव येथील 42 वर्षीय तरुण, हिरेवाडीतील 48 वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथील 28 व 24 वर्षीय तरुण, मोधळवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जांभुळवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, बिरेवाडीतील 25 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 60 व 46 वर्षीय महिला व पिंपळगाव माथा येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.


तालुक्यातील अन्य गावांमधील धांदरफळ खुर्द येथील 30 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 56 व 42 वर्षीय महिलांसह 12 वर्षीय मुलगा, धांदरफळ बु. येथील 34 वर्षीय महिलेसह दोन वर्षीय बालिका, सावरगाव तळ येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 व 44 वर्षीय इसम, 33 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुण, चिचोंली गुरव येथील 47 व 43 वर्षीय इसमांसह 28 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय इसम, 40 वर्षीय महिला व 39 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 70 वर्षीय महिलेसह 47 वर्षीय इसम, चंदनापूरीतील 45 वर्षीय इसम, कोल्हेवाडी येथील 33 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 24 वर्षीय तरुण,


जोर्वे येथील 40 वर्षीय महिला, चिखली येथील 52 वर्षीय इसम, प्रतापपूर येथील 34 वर्षीय तरुण, निमोण येथील 25 वर्षीय तरुण, जाखुरी येथील 40 व 27 वर्षीय महिला, मंगळापूर येथील 50 व 30 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 35 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 45 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय मुलगी व नऊ वर्षीय मुलगा, ढोलेवाडीतील 54 वर्षीय इसम, आश्‍वी खुर्दमधील 65 वर्षीय महिला व शिबलापूर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज संगमनेर तालुक्यातील 95 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले तर नव्याने 109 रुग्णांची भर पडली. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 24 हजार 564 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पठारभागात उद्यापासून (ता.31) कडकडीत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मागील दहा दिवसांपासून जिल्ह्याचा कोविड आलेखही एकसारखा उंचावत असून आजही त्यात तब्बल 918 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आज संगमनेरसह कर्जत व पारनेर तालुक्यातून तीन आकडी संख्येने रुग्ण आढळले असून संगमनेर तालुक्यात सर्वाधीक 109, कर्जत व पारनेर तालुक्यात प्रत्येकी 102, शेवगाव 93, जामखेड 67, पाथर्डी 66, श्रीगोंदा 63, नगर ग्रामीण 47, अकोले 46, राहाता 42, राहुरी 37, नेवासा 34, कोपरगाव व श्रीरामपूर प्रत्येकी 30, अहमदनगर महापालिका क्षेत्र 24, इतर जिल्ह्यातील 23 व भिंगार लष्करी परिसरातील तिघांचा त्यात समावेश आहे. आज जिल्ह्यातील 774 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील दहा जणांचा कोविडने बळी घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 86 हजार 308 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून 6 हजार 165 जणांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयांमध्ये 5 हजार 687 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 96.02 टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *